हार्बरचे ‘डीसी-एसी’ मार्च २0१६पर्यंत
By Admin | Updated: October 20, 2015 02:50 IST2015-10-20T02:50:11+5:302015-10-20T02:50:11+5:30
हार्बरवरील डीसी ते एसी परावर्तनाचे काम मार्च २0१६पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या विद्युत विभागाचे सदस्य नवीन टंडन यांनी दिली.

हार्बरचे ‘डीसी-एसी’ मार्च २0१६पर्यंत
मुंबई : हार्बरवरील डीसी ते एसी परावर्तनाचे काम मार्च २0१६पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाच्या विद्युत विभागाचे सदस्य नवीन टंडन यांनी दिली.
सोमवारी रेल्वे बोर्डाच्या विद्युत विभागाचे सदस्य नवीन टंडन हे मुंबई भेटीवर आले. या भेटीत त्यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा, मुख्य विद्युत अभियंता राजीव अग्रवाल आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत हार्बरवरील डीसी-एसी परावर्तनासंदर्भात सखोल चर्चा केली आणि त्याची माहिती घेतली. त्यानंतर टंडन यांनी पत्रकारांशी संवाद साधत हार्बरवरील परावर्तन मार्च २0१६पर्यंत पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर त्वरित सर्व लोकल या एसी परावर्तनावर धावतील. त्यामुळे लोकलचा वेग वाढण्याबरोबरच नवीन लोकल धावण्यासाठी मदत मिळेल. नवीन बम्बार्डियर लोकल मुंबईत नोव्हेंबरपासून दर महिन्याला चार याप्रमाणे दाखल होतील. (प्रतिनिधी)