हार्बर अडीच तास विस्कळीत
By Admin | Updated: August 13, 2014 03:18 IST2014-08-13T03:18:24+5:302014-08-13T03:18:24+5:30
ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना सोमवारी घडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही हार्बर रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला

हार्बर अडीच तास विस्कळीत
मुंबई : ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना सोमवारी घडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही हार्बर रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी सीएसटी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे तब्बल अडीच तास विस्कळीत झाली आणि त्यामुळे ५४ लोकल रद्द करण्यात आल्या.
सोमवारी मशीद स्थानक आणि सीएसटी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर दोन तास विस्कळीत झाली होती. यानंतर मंगळवारीही याच घटनेची पुनरावृत्ती झाली आणि डोक्याला हात मारून घेण्याशिवाय हार्बरच्या प्रवाशांना पर्याय राहिला नाही. दुपारी १२च्या सुमारास सीएसटी स्थानकाजवळ १ आणि २ नंबर प्लॅटफॉर्मच्या क्रॉसिंगवरच असलेली ओव्हरहेड वायर तुटली. क्रॉसिंगवरच वायर तुटल्याने आणि हार्बर प्रवाशांना त्याचा फटका अधिक बसू नये म्हणून सीएसटीच्या ३ नंबर प्लॅटफॉर्मवरूनच लोकल टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यासाठी कुर्ला
येथून टॉवर वॅगन आणण्यात आली आणि ब्लॉक घेऊन १२.१0 ते २.१५ दरम्यान त्याचे काम करण्यात आले. (प्रतिनिधी)