रुळाला तडा गेल्याने हार्बर विस्कळीत

By Admin | Updated: December 6, 2014 00:42 IST2014-12-06T00:42:25+5:302014-12-06T00:42:25+5:30

बेलापूर रेल्वे स्थानकालगत रुळाला तडा गेल्याने शुक्रवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे दुपारपर्यंत पनवेल - सीएसटी मार्गावर धीम्या गतीने लोकल धावत होत्या.

Harbor disrupted when the Rola collapsed | रुळाला तडा गेल्याने हार्बर विस्कळीत

रुळाला तडा गेल्याने हार्बर विस्कळीत

नवी मुंबई : बेलापूर रेल्वे स्थानकालगत रुळाला तडा गेल्याने शुक्रवारी सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे दुपारपर्यंत पनवेल - सीएसटी मार्गावर धीम्या गतीने लोकल धावत होत्या. सकाळी नोकरीवर जाण्याच्या धावपळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मोटरमनच्या वेळीच लक्षात आल्याने तेथे संभाव्य दुर्घटना टळली.
बेलापूर स्थानकाबाहेर सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे मार्गावर हा प्रकार घडला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तेथे रुळाला तडा गेल्याची बाब मोटरमनच्या निदर्शनास आली. त्यामुळे पनवेलकडून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे थांबवण्यात आल्याने सीबीडी स्थानकाबाहेर रेल्वेच्या रांगा लागल्या होत्या. या प्रकारात सुमारे एक तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर रुळाला तडा गेलेल्या ठिकाणी उभी असलेली रेल्वे मागे घेऊन विरुध्द दिशेच्या मार्गाने चालवण्यात आल्या. त्याकरिता दोनही मार्गाच्या रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Harbor disrupted when the Rola collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.