हार्बर कोलमडली
By Admin | Updated: June 15, 2016 04:14 IST2016-06-15T04:14:52+5:302016-06-15T04:14:52+5:30
हार्बरवर बिघाड सत्र सुरूच असून, मंगळवारी पुन्हा एकदा झालेल्या बिघाडामुळे हार्बर रेल्वे चांगलीच कोलमडली. वांद्रे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि जवळपास एक तास सीएसटी

हार्बर कोलमडली
मुंबई : हार्बरवर बिघाड सत्र सुरूच असून, मंगळवारी पुन्हा एकदा झालेल्या बिघाडामुळे हार्बर रेल्वे चांगलीच कोलमडली. वांद्रे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि जवळपास एक तास सीएसटी ते अंधेरी सेवा कोलमडली. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला.
सकाळी ६.३८ च्या सुमारास वांद्रे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होऊन सीएसटी ते वांद्रे आणि अंधेरी मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतुकीला फटका बसला. २0 ते २५ मिनिटे उशिराने लोकल धावत असल्याने प्रवाशांना गर्दीला सामोरे जावे लागले. बिघाड दुरुस्त करण्यास सकाळचे ७.३0 वाजले. दुरुस्तीही लोकल सकाळी नऊ वाजेपर्यंत उशिरानेच धावत होत्या. या घटनेमुळे आठ लोकल रद्द होतानाच ३४ फेऱ्यांना उशीर लागल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
एप्रिल महिन्यापासून
घडलेल्या घटना
४ एप्रिल : रबाळे स्थानकाजवळ स. ८.४0 वाजता ओव्हरहेड वायर तुटली. ठाणे-पनवेल या ट्रान्स हार्बरचा बोजवारा.
१५ एप्रिल : मशिदबंदर स्थानकाजवळ डाउन लोकलमध्ये साडेपाचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. एक तास हार्बर ठप्प.
२४ मे : वांद्रे स्थानकाजवळ लोकलचा पेन्टाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकला. स. ११ वाजता घटना घडली, एक तास बोजवारा.
१ जून : हार्बरच्या रावळी येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड. संध्याकाळी साडेपाच वाजता बिघाड. एक तास हार्बर कोलमडली.
१२ जून : हार्बरच्या रावळी जंक्शन येथेच ट्रॅकजवळील झोपड्यांमध्ये इंटरनेटची जोडणी करताना, ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने एक व्यक्ती जखमी झाला. हार्बर विस्कळीत.