हॅपी न्यू इयरची घसरगुंडी
By Admin | Updated: November 2, 2014 01:15 IST2014-11-02T01:15:02+5:302014-11-02T01:15:02+5:30
शाहरूख खानसाठी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित होणो हे लकी मानले जाते. मात्र या वर्षीची दिवाळी त्याच्यासाठी फारशी चांगली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हॅपी न्यू इयरची घसरगुंडी
कमाईचे चार दिवस : मार्केटिंगचा भर ओसरताच लोकाश्रयाला ओहोटी
अनुज अलंकार - मुंबई
शाहरूख खानसाठी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित होणो हे लकी मानले जाते. मात्र या वर्षीची दिवाळी त्याच्यासाठी फारशी चांगली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या हॅपी न्यू इयर चित्रपटाने मार्केटिंगच्या बळावर पहिले चार दिवस तुफान व्यवसाय केला. पण मार्केटिंगची जादू ओसरल्यानंतर गुणवत्तेच्या बळावर मात्र हा चित्रपट लोकाश्रय मिळवू शकलेला नाही. किंबहुना शाहरूखचे चाहते नसलेल्या प्रेक्षकांच्या पसंतीला हा चित्रपट अजिबात उतरू शकलेला नाही. परिणामी लोकप्रियतेच्या बाबतीत हॅपी न्यू इयरची वेगवान घसरगुंडी अनुभवण्यास येत आहे.
या चित्रपटाने आतार्पयत फक्त 157 कोटींची कमाई केली आहे. हॅपी न्यू इयर प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच त्याने 44 कोटींपेक्षा जास्त कमाई करीत रेकॉर्ड केला होता. त्यामुळे या वर्षी प्रदर्शित झालेल्या सलमान, आमीर तसेच इतर कलाकारांच्या चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड हा चित्रपट मोडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण एक आठवडा पूर्ण होण्याआधीच त्याने कच खाल्ली. त्यामुळे कमाईच्या बाबतीत या वर्षी शाहरूखला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.
शाहरूख खानच्या प्रॉडक्शन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हॅपी न्यू इयरने 157 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवडय़ातील इतर चित्रपटांनी केलेली भरपूर कमाई पाहता ही कमाई कमी आहे. आकडय़ांचे हे गणित लक्षात घेतल्यावर हा चित्रपट 2क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता धूसर झाली आहे.
ट्रेड जाणकारांनुसार, चित्रपटाची कमाई झपाटय़ाने कमी होत असून, अशीच परिस्थिती राहिली तर चित्रपट या क्लबमध्ये स्थानच मिळवू शकणार नाही. 2क्क् कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणारे सध्या पाच चित्रपट आहेत. त्यात सर्वाधिक 284 कोटींची कमाई करत ‘धूम’ चित्रपटाने बाजी मारली आहे. त्यानंतर ‘क्रिश 3’ने 224 कोटी कमाई, ‘किक’ने 231 कोटींची कमाई केली आहे.
तर गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला शाहरूखच्याच ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने 227 कोटींची कमाई करीत चौथे स्थान मिळवले आहे.
एकंदर परिस्थिती पाहता हॅपी न्यू इयर धूम 3 चित्रपटाची बरोबरी करूच शकत नाही. मात्र हा चित्रपट आपल्याच कंपनीचा रेकॉर्ड मोडतोय का ते पाहणो आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
अशी आहे एकंदर कमाई
च्पहिल्याच दिवशी हॅपी न्यू इयर चित्रपटाने 44 कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला होता. याआधीच्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई पाहायची झाल्यास ‘धूम 3’ने 36 कोटी, ‘किक’ आणि ‘क्रिश 3’ चित्रपटांनी 32 कोटींची कमाई केली होती. पहिल्या तीन दिवसांच्या कमाईत हॅपी न्यू इयर चित्रपटानेच बाजी मारली होती. या तीन दिवसांत त्याची कमाई 1क्8 कोटी होती. तर धूम 3ची 1क्7 कोटींच्या आसपास होती. किकची कमाई 83 कोटी, क्रिश 3ची 78 कोटी तर ‘बँग बँग’ चित्रपटाची कमाई 94 कोटी होती.
च्आठवडय़ाच्या कमाईबाबतीत आमीर खानचा धूम 3 चित्रपट 188 कोटींपेक्षा जास्त कमाई करीत आघाडीवर आहे. तर क्रिश 3ने 116 कोटी आणि किक चित्रपटाने 164 कोटी कमाई केली आहे. यानंतर शाहरूखच्या हॅपी न्यू इयरचा नंबर लागत असून, त्याने फक्त 157 कोटींची कमाई केली आहे. यावरून आकडय़ांचे गणित किती झपाटय़ाने बदलू शकते त्याची कल्पना येते.