मुंबईतील घरात पंख्यावर लटकला अजगर
By Admin | Updated: December 11, 2014 11:07 IST2014-12-11T11:06:24+5:302014-12-11T11:07:32+5:30
मुंबईतील एका घरात पंख्यावर लटकलेला अजगर आढळल्याने मोठी खलबळ उडाली. माहीम येथे हा प्रकार घडला असून सुदैवाने घरातील सर्व नागरिक सुखरूप आहेत.

मुंबईतील घरात पंख्यावर लटकला अजगर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - मुंबईतील एका घरात पंख्यावर लटकलेला अजगर आढळल्याने मोठी खलबळ उडाली. माहीम येथे हा प्रकार घडला असून सुदैवाने घरातील सर्व नागरिक सुखरूप आहेत.
माहिम येथील घरात रात्री सर्वजण झोपले असताना अचनाक पंखा बंद झाल्याने ते जागे झाले. मात्र लाईट लावताच त्यांची भीतीने गाळण उडाली. कारण पंख्याला एक मोठा अजगर लटकल्याने पंखा फिरणं बंद झाला होता. ही माहिती वा-यासारखी पसरली व आजूबाजूच्या सर्वांनी घरासमोर गर्दी केली. त्यापैकी काही जणांनी सर्पमित्रांना पाचारण केले व दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अजगराला पकडण्यात यश आले. आता या अजगराला वनाधिका-यांच्या ताब्यात देण्यात आले असून लवकरच त्याला जंगलात सोडण्यात येईल.