Join us

घराची आठवण टिपण्यासाठी सरसावले हात, भुयारी मार्ग प्रकल्पासाठी दुसऱ्या दिवशीही कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 08:51 IST

Mumbai News: पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे- बोरिवली गीन टनेल प्रकल्पासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली.

मुंबई - पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे- बोरिवली गीन टनेल प्रकल्पासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली. फरले वाडीतील झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला. घरे तोडतांना, अनेक रहिवाशांनी घराची शेवटची आठवण मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपत अनेक वर्षांच्या सुख, दुःखांच्या आठवणींना उजाळा दिला.

मीनदोस्त झालेली आपली घरे पाहून अनेकजण भावुक झालेले दिसले, तर अनेकजण रस्त्यावर मांडलेला संसार टेम्पोत भरताना दिसत होते. येथील ज्या झोपड्या या प्रकल्पात जाणार आहेत. त्यामुळे शासनाने एसआरए प्रकल्पातून पर्यायी घरे द्यावीत, अशी मागणी आहे. या संदर्भात एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्याबरोबर बैठका झाल्याचे येथील  जमीनदोस्त झालेल्या झोपड्यांच्या ढिगाऱ्यांकडे रहिवासी हताशपणे पाहत होते. अनेक जणांनी तोडक कारवाई करताना मोबाइल कॅमेऱ्यात घराचे शेवटचे क्षण साठवून घेतले. तर कामगार ढिगाऱ्यातील स्टील तसेच इतर वस्तू वेगळे करण्यात आले. 

पुन्हा विरोध अन् समजूतज्या झोपडपट्टीधारकांनी भाडे नाकारले आहे त्यांच्या झोपड्या आधी तोडा असे म्हणत अनेकांनी कारवाईला विरोध केला. मात्र, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर विरोध मावळला. त्यानतंर कारवाई सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, झोपडपट्टीधारकांना एमएमआरडीएकडून महिना २०,००० रुपयांप्रमाणे एकूण ११ महिन्यांच्या भाड्यापोटी २,२०००० रुपये देण्यात आले आहेत.-

English
हिंदी सारांश
Web Title : Homes Demolished for Thane-Borivali Tunnel; Residents Capture Last Memories.

Web Summary : Demolition for the Thane-Borivali tunnel project continued. Residents of Farle Wadi captured final memories of their homes being razed. Affected families, offered temporary housing, demand permanent SRA homes. Some protested, but the work proceeded after officials intervened.
टॅग्स :मुंबई