चेंबूर येथे अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By Admin | Updated: June 18, 2014 02:39 IST2014-06-18T02:39:49+5:302014-06-18T02:39:49+5:30

पलिका भुखंडावर अनधिकृत शेड उभारुन अतिक्रमण करणाऱ्या चेंबूरमधील २५ गॅरेजवर आज महापालिकेने हातोडा फिरवला

Hammer on unauthorized constructions at Chembur | चेंबूर येथे अनधिकृत बांधकामांवर हातोडा

चेंबूर येथे अनधिकृत बांधकामांवर हातोडा

मुंबई : पलिका भुखंडावर अनधिकृत शेड उभारुन अतिक्रमण करणाऱ्या चेंबूरमधील २५ गॅरेजवर आज महापालिकेने हातोडा फिरवला.
गेल्या २० ते २५ वर्षांपासून चेंबूरच्या सुमन नगर परिसरातील प्लॉट नंबर ४१९ वर ही गॅरेज सुरु आहेत. महागड्या गाड्यापासून ट्रक, ट्रेलर आणि क्रेनची या ठिकाणी दुरुस्ती होते. अनेक दिवसांपासून या जागेचा वाद असताना आज अचानक पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक जेसीबी घेऊन या ठिकाणी धडकले. त्यानंतर काही मिनिटातच त्यांनी ही सर्व गॅरेज जमिनदोस्त केली. चेंबूरयेथील उच्चभ्रू वस्तीत ८
एकर जागेत ही गॅरेज वसले आहे. (वार्ताहर)

Web Title: Hammer on unauthorized constructions at Chembur