सिडकोचा अनधिकृत इमारतींवर हातोडा
By Admin | Updated: May 12, 2015 22:56 IST2015-05-12T22:56:25+5:302015-05-12T22:56:25+5:30
खारघरमधील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर फिफ्टी-फिफ्टी च्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या तीन अनधिकृत इमारती सिडकोने तोडून जमीनदोस्त केल्या

सिडकोचा अनधिकृत इमारतींवर हातोडा
पनवेल : खारघरमधील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर फिफ्टी-फिफ्टी च्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या तीन अनधिकृत इमारती सिडकोने तोडून जमीनदोस्त केल्या. विशेष म्हणजे फरशीपाडा याठिकाणी अनधिकृत इमारतीच्या मागील बाजूस मशिद असल्याने सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने इमारत पाडण्यासाठी काँक्रिट क्र शरचा प्रथमच उपयोग करण्यात आला.
फरशीपाडा याठिकाणी २ तर रांजनपाडा, ओवे पेठ याठिकाणी देखील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच फरशीपाडा याठिकाणी १३ अनधिकृत इमारतींवर सिडकोने आपला हातोडा चालवला होता. त्यापैकी काही बांधकाम व्यावसायिकांनी न्यायालयामार्फत सिडकोच्या कारवाईला स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठवल्यानंतर सिडकोच्या मार्फत कारवाई करण्यात आली.
अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे मनोहर मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी सिडकोचे कर्मचारी तसेच खारघर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त होता. तीन जेसीबी, १ क्र शर मशिन यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ती सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)