Join us

वरळीतील १६९ बेकायदा बांधकामांवर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:13 IST

या कारवाईमुळे परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या तक्रारींना आळा बसण्याची शक्यता आहे.

मुंबई :  वरळी येथील खान अब्दुल गफार खान मार्गावरील मद्रासवाडी परिसरातील १६९ अनधिकृत बांधकामे मुंबई महानगरपालिकेच्या जी (दक्षिण) विभागाकडून शुक्रवारी पाडण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील पावसाचे पाणी साचण्याच्या तक्रारींना आळा बसण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी उपायुक्त प्रशांत सपकाळे आणि जी (दक्षिण) विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही करण्यात आली, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : BMC Demolishes 169 Illegal Structures in Worli, Mumbai

Web Summary : Mumbai's BMC demolished 169 unauthorized constructions in Worli's Madraswadi area. The action, led by civic officials, addresses waterlogging issues in the area. Dr. Ashwini Joshi oversaw the operation.
टॅग्स :अतिक्रमणमुंबई महानगरपालिका