हमाली दरांत १ जुलैपासून वाढ

By Admin | Updated: June 16, 2016 02:48 IST2016-06-16T02:48:28+5:302016-06-16T02:48:28+5:30

पश्चिम रेल्वेवर हमालीच्या दरांत १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ ५ रुपयांपासून २0 रुपयांपर्यंत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस तसेच सुरत स्थानक ए-१ श्रेणीत

Hamali rates increase from 1st July | हमाली दरांत १ जुलैपासून वाढ

हमाली दरांत १ जुलैपासून वाढ

मुंबई : पश्चिम रेल्वेवर हमालीच्या दरांत १ जुलैपासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ ५ रुपयांपासून २0 रुपयांपर्यंत आहे. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस तसेच सुरत स्थानक ए-१ श्रेणीत मोडतात. या स्थानकांसाठी ४० किलोग्रॅमपर्यंतचे सामान उचलण्यासाठी आता प्रति ट्रिप ५० रुपये आकारणी केली जाईल. तर बी आणि सी श्रेणीच्या स्थानकांसाठी ४५ रुपये दर लागू होतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातून मध्य रेल्वेवर आणि मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेवर सामान वाहून नेण्यासाठी हमालांना ५० रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे आजारी अथवा अपंग प्रवाशांना व्हील चेअरवरुन किंवा स्ट्रेचरवरून नेण्याच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वीच हमालांच्या दरात बदल केले होते.

Web Title: Hamali rates increase from 1st July