तत्काळ कोटय़ाची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने

By Admin | Updated: October 3, 2014 02:30 IST2014-10-03T02:30:48+5:302014-10-03T02:30:48+5:30

रेल्वेने तत्काळ कोटय़ातील 5क् टक्के तिकिटांना ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ लागू केल्याने प्रवाशांना आता ही तिकिटे चढय़ा दराने खरेदी करावी लागणार आहेत.

Half of an instant queue upside down in the house | तत्काळ कोटय़ाची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने

तत्काळ कोटय़ाची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने

>मुंबई/नवी दिल्ली : रेल्वेने तत्काळ कोटय़ातील 5क् टक्के तिकिटांना ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ लागू केल्याने प्रवाशांना आता ही तिकिटे चढय़ा दराने खरेदी करावी लागणार आहेत. भाडे आकारणीची ही नवी पद्धत बुधवार, 1 ऑक्टोबरपासून लागू झाली असून त्यामुळे सणासुदीच्या हंगामात ऐनवेळी प्रवास 
करावा लागणा:यांचा हिरमोड होणार आहे.
रेल्वे खात्याच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, देशभरात धावणा:या 8क् निवडक रेल्वेगाडय़ांसाठी ही ‘प्रीमियम तत्काळ तिकीट योजना’ 1 ऑक्टोबरपासून लागू झाली असून या तिकिटांचे फक्त ऑनलाइन बुकिंग करता येईल. प्रत्येक विभागीय रेल्वेला यासाठी प्रत्येकी पाच गाडय़ा निवडण्यास सांगण्यात आले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.
या योजनेनुसार प्रत्येक गाडीत तत्काळ कोटय़ात उपलब्ध असलेल्या एकूण तिकिटांपैकी पहिली 5क् टक्के तिकिटे नेहमीच्या तत्काळ तिकिटांच्या दराने उपलब्ध होतील. त्यानंतरची 5क् टक्के तिकिटे ‘डायनॅमिक प्रायसिंग’ पद्धतीने विकली जातील. म्हणजे मागणी जेवढी जास्त तेवढी किंमत जास्त हे तत्त्व लागू होईल.
रेल्वे तिकिटांच्या काळ्याबाजारास आळा घालण्याचा हा एक उपाय असल्याचे रेल्वेचे म्हणणो आहे. अगदी निकड म्हणून प्रवास करू इच्छिणा:या प्रवाशांची काळाबाजार करणा:या दलालांकडून लूट केली जाते, असे लक्षात आल्याने ही योजना सुरू करण्यात आल्याचे हा अधिकारी म्हणाला. गेल्या एप्रिलमध्ये रेल्वेने तत्काळ तिकिटांचे दर दुस:या वर्गाच्या आरक्षित आसनाच्या दराच्या 1क् टक्क्यांनी व इतर सर्व वर्गासाठी 3क् टक्क्यांनी वाढविले होते. आता ही नवी योजना लागू केल्याने तत्काळ कोटय़ातील निम्मी तिकिटे याहूनही महागणार आहेत. याखेरीज तीन प्रीमियम रेल्वेगाडय़ांची सर्व आरक्षित तिकिटेही अशाच ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ने विकली जात आहेत.
असे आकारले जाईल भाडे  
एखाद्या गाडीच्या तिस:या वर्गाच्या वातानुकूलित डब्यात तत्काळ कोटय़ाची एकूण 6क् तिकिटे उपलब्ध असतील तर त्यातील 3क् तिकिटे नेहमीच्या तत्काळ तिकिटाच्या दराने विकली जातील. राहिलेल्या 3क् तिकिटांपैकी 1क् टक्के म्हणजे तीन तिकिटे 2क् टक्के चढय़ा दराने मिळतील. यानंतर शिल्लक राहिलेल्या 27 तिकिटांपैकी 1क् टक्के तिकिटांना आणखी 2क् टक्के चढा दर लागू होईल. अशा प्रकारे कोटय़ातील शेवटचे तिकीट विकले जाईर्पयत भाडे चढय़ा दराने वाढत जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
या रेल्वे गाडय़ांत 
होणार अंमलबजावणी
च्मध्य रेल्वेकडून 3 ऑक्टोबरपासून 11015 एलटीटी ते गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस, 12534 सीएसटी ते लखनौ पुष्पक एक्स्प्रेस, 11093 सीएसटी ते वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, 12141 सीएसटी ते राजेंद्र नगर एक्स्प्रेससाठी; आणि पश्चिम रेल्वेकडून 12951 मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस, 12953 मुंबई ते नवी हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस, 12957 अहमदाबाद-नवी दिल्ली स्वर्ण जयंती राजधानी एक्स्प्रेस, 
12925 वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, 12903 मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल मेल, 12480 वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस, 12490 दादर-बिकानेर एक्स्प्रेस, 11125 इंदौर-ग्वाल्हेर एक्स्प्रेस, 21125 इंदौर ते भिंड एक्स्प्रेससाठी या नव्या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

Web Title: Half of an instant queue upside down in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.