बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी हेअर डिझायनरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:24 IST2020-12-11T04:24:39+5:302020-12-11T04:24:39+5:30

रिक्षाचालकालाही घेतले ताब्यात : एनसीबीच्या कारवाईत कोकेन जप्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) ...

Hair designer arrested in Bollywood drugs connection case | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी हेअर डिझायनरला अटक

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी हेअर डिझायनरला अटक

रिक्षाचालकालाही घेतले ताब्यात : एनसीबीच्या कारवाईत कोकेन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी बुधवारी रात्री अंधेरीतील ओशिवरा परिसरात छापा टाकून एका हेअर स्टायलिस्टसह रिक्षाचालकाला अटक केली. सूरज गुडाम्बे व लालचंद्र यादव अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून ११ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेअर स्टायलिस्ट सूरज हा बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांसाठी काम करताे, त्यामुळे त्याच्याकडून काही जण अंमली पदार्थ घेत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, दोघांना १६ डिसेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या ड्रग्ज सेवनाच्या अनुषंगाने एनसीबीने मंगळवारी जितेंद्र जैन ऊर्फ रंगेल महाकाल ऊर्फ जीत व मोहम्मद आझम जुम्मान शेख या दोघा तस्करांना अटक केली. जीत हा गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबीच्या रडारवर होता. तस्कर अनुज केशवानीने त्याच्याकडून ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने बुधवारी रात्री उशिरा ओशिवरातील मीरा टॉवरमध्ये छापा टाकून हेअर स्टायलिस्ट सूरजला अटक केली. परिसरातील रिक्षाचालक यादवलाही पकडले. झडतीत त्यांच्याकडे ११ ग्रॅम कोकेन सापडले.

* रिक्षातून करायचे अमली पदार्थांची डिलिव्हरी

हेअर स्टायलिस्ट सूरज गुडाम्बे अनेक नामवंत अभिनेत्यांसाठी काम करत आहे. त्याने अभिनेता वरुण धवन, अरबाज खान, राजकुमार राव आदींबरोबरचे अनेक फोटो त्याच्या सोशल अकाउंटवर पोस्ट केले आहेत. गुडाम्बे व यादव हे दोघे रिक्षातून अमली पदार्थांची डिलिव्हरी करायचे.

....................

-------

Web Title: Hair designer arrested in Bollywood drugs connection case