मुंबईत गारठा कायम, किमान तापमान १५ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:50+5:302021-02-05T04:27:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे किमान तापमान पुन्हा खाली उतरले आहे. बुधवारी किमान तापमानाची नोंद १५.३ अंश सेल्सिअस ...

मुंबईत गारठा कायम, किमान तापमान १५ अंशांवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे किमान तापमान पुन्हा खाली उतरले आहे. बुधवारी किमान तापमानाची नोंद १५.३ अंश सेल्सिअस एवढी झाली. राज्यातही किमान तापमान खाली उतरले असून, बहुतांश ठिकाणी गारठा कायम असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरात किमान तापमानात घट झाली आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, मालेगाव, सातारा, महाबळेश्वर, पुणे, बारामती आणि औरंगाबाद येथील किमान तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविण्यात आले. किमान तापमान खाली घसरण्याचा ट्रेंड पुढील २४ तास कायम राहील.
राज्याचा विचार केल्यास, राज्यात किमान तापमानात पुढील २ दिवस घट होण्याची शक्यता आहे. उत्तर -मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान १० ते १२ अंश, तर मुंबई, ठाणे येथे १५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात येईल.
.....................