Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिम ट्रेनरचा श्वास कोंडल्याने मृत्यू, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 18:11 IST

घरच्यांनी तसेच इमारतीमधील लोकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत श्रीप्रस्था परिसरातील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

(मंगेश कराळे)-नालासोपारा - जिम ट्रेनरचा श्वास कोंडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नालासोपाऱ्यात येथे घडली आहे. यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या देविदास विनायक जाधव (३५) याला रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यानंतर घरच्यांनी तसेच इमारतीमधील लोकांनी त्यांना बेशुद्धावस्थेत श्रीप्रस्था परिसरातील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

याबाबत नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत विनायक जाधव हे एक जीम ट्रेनर म्हणून काम करत होते. नाळा डिसिल्वानगर येथील 'द फिटनेस कार्डेस' या जिममध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईव्यायाम