मुलुंड खंडणी प्रकरणी रिकव्हरी एजन्सीचा मालक गजाआड
By Admin | Updated: December 27, 2014 01:00 IST2014-12-27T01:00:09+5:302014-12-27T01:00:09+5:30
दुबईमधून मुंबईत स्थायिक झालेल्या अभियंत्याला कर्ज वसूलीच्या नावाखाली धमकावून १० लाखांची खंडणी मागणा-या दोन रिकव्हरी एजंटांना गुन्हे शाखेने अटक केली

मुलुंड खंडणी प्रकरणी रिकव्हरी एजन्सीचा मालक गजाआड
मुंबई: दुबईमधून मुंबईत स्थायिक झालेल्या अभियंत्याला कर्ज वसूलीच्या नावाखाली धमकावून १० लाखांची खंडणी मागणा-या दोन रिकव्हरी एजंटांना गुन्हे शाखेने अटक केली होती. या गुन्हयातील मुख्य सूत्रधार असलेल्या एजन्सीच्या मालकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, खार येथे डी. आय. मॅनेजमेंट इंटरनॅशनल कंपनी या नावाखाली आरोपी कार्यरत होते. दिल्ली येथे या कंपनीची मुख्य शाखा असून आरोपी अध्यक्षाच्या सांगण्यावरुन अटक आरोपी सचिन आणि संचिता तक्रारदाराकडून खंडणी उकळत होते.
खंडणीप्रकरणी दोन आरोपींंच्या मुसक्या आवळताच कंपनी अध्यक्षाने कंपनी कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढला होता. आज खार परिसरातील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या पत्नीला पाहण्यासाठी आरोपी येणार असल्याची माहीती मुलुंड पोलिसांना लागली.
त्यानूसार सायंकाळच्या सुमारास मुलुंड नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक रामदास मोरे यांंच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सापळा रचून कंपनी अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याच्यी माहीती मोरे यांनी दिली. (प्रतिनिधी)