ठाण्यात पकडला ८० लाखांचा गुटखा
By Admin | Updated: March 11, 2017 01:20 IST2017-03-11T01:20:37+5:302017-03-11T01:20:37+5:30
राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना चोरट्या मार्गाने मुंबईत विक्रीसाठी नेण्यात येत असलेला सुमारे ८० लाख रुपयांचा गुटखा ठाणे गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने

ठाण्यात पकडला ८० लाखांचा गुटखा
ठाणे : राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना चोरट्या मार्गाने मुंबईत विक्रीसाठी नेण्यात येत असलेला सुमारे ८० लाख रुपयांचा गुटखा ठाणे गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने गुरुवारी रात्री खारेगाव टोलनाक्यावर पडकला. या कारवाईत चौघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
खारेगाव टोलनाकामार्गे नाशिक येथून मुंबईत दोन ट्रकमधून सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा) विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती ठाणे अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार, एमएच ४८ टी ९६४५ आणि एमएच ४८ एजी ३९४२ हे दोन ट्रक पकडण्यात आले.
त्या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे ८० लाख रुपयांचा गुटखा मिळून आला. तसेच वसईतील मोहमद खान मोहमद हकिम (२४) तर कुर्ला येथील बुरेखान शराफत खान (३५), नसरूल रईस खान (२६) आणि कलिम जाफर खान (१९) अशा ट्रकचालक आणि क्लीनर असलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
- अमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक घोसाळकर, पोलीस उपनिरीक्षक वालझाडे, बांगर, उपाळे, पोलीस हवालदार गोंदके, पोलीस नाईक सोनावणे, किणी, टोपले, भोगले, चव्हाण, पोलीस शिपाई चाबूकस्वार, राक्षे, ढोणे यांनी ही कारवाई केली.