Gujarat's lion will soon come to Mumbai | गुजरातचा सिंह लवकरच येणार मुंबईत
गुजरातचा सिंह लवकरच येणार मुंबईत

मुंबई : रुबाबदार बिबट्या आणि बारसिंगाच्या देखण्या जोडीनंतर आता राणीच्या बागेत जंगलाचा राजाच अवतरणार आहे. गुजरातमधील जुनागढ येथे असलेल्या साखरबाग प्राणिसंग्रहालयातील सिंहाची बराच काळापासून मुंबईत प्रतीक्षा सुरू होती. या मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्यामुळे पुढच्या महिन्यात बच्चे कंपनीला सिंहाची जोडी पाहता येणार आहे.

भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने आता नवीन प्राणी येथे आणण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात बिबट्या आणि बारसिंगाची जोडी राणीबागेत आणण्यात आली. बिबट्या आक्रमक असल्याने सध्या त्याचे निरीक्षण करण्यात येत असून महिन्याभराने नागरिकांना त्याचे दर्शन होईल़ त्याचबरोबर आता सिंहाची जोडीही जुलै महिन्यात राणीबागेत दाखल होणार आहे.

सेंट्रल झू ऑथोरिटीने काही दिवसांपूर्वी सिंहाच्या जोडीचे हस्तांतरण करण्याच्या राणीबागेच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला होता.
उर्वरित कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक साखरबाग येथे जाऊन जंगलच्या राजाला राणीबागेत आणणार आहेत. मात्र त्यांना किमान दोन महिने वेगळे ठेवून त्यांचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर ते मुंबईतील वातावरणात रुळल्यानंतर दोन हजार चौ.मी. पिंजºयात त्यांना सोडण्यात येणार असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.

दररोज येणारे पर्यटक- 8000-10000
वीकेण्डला- 15000
पेंग्विन आल्यापासून वीकेण्डला- 30000
माणशी - 50/- शुल्क
कुटुंब (आई, वडील, दोन मुले)- 100/-
एप्रिल २०१८ पासून उत्पन्न - 7,00,000,000/-
५ मे २०१९ उत्पन्न - 5,00,000/-


Web Title: Gujarat's lion will soon come to Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.