Join us  

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:08 PM

पुढील उपचारासाठी (रिहॅबिलिटेशन) अनुज यांना गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे पुत्र अनुज यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने १ मे रोजी माहीम येथील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. १५ दिवसांच्या उपचारानंतर अनुज पटेल यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारासाठी (रिहॅबिलिटेशन) अनुज यांना गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अनुज पटेल यांना ३० एप्रिल रोजी अहमदाबाद येथील के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यावेळी सोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. बी. के. मिश्रा यांनी अनुज यांच्या मेंदूवर शस्त्रकिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर अनुज पटेल यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले. ते इतरांशी संवादही साधत आहेत. सध्या अनुज यांची प्रकृती स्थिर असल्याचे हिंदुजा रुग्णालयाने कळविले आहे.

टॅग्स :भूपेंद्र पटेलभाजपाहॉस्पिटल