Join us  

सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, एमएचटी सीईटीची परीक्षा २ मे पासून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 3:31 AM

इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत.

मुंबई : इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २ ते १३ मे या कालावधीत घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. यासाठी सीईटी सेलने उमेदवारांना परीक्षेदरम्यान काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचना दिल्या आहेत. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे ठरणार असून, विहित वेळेतच उमेदवारांनी केंद्रावर पोहोचावे, अशी माहिती सीईटी आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

परीक्षेसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे असून, ते वैध असेल तरच उमेदवाराच्या मूळ कागदपत्रावरील छायाचित्र आणि स्वाक्षरी वैध ठरणार असल्याचे रायते यांनी सांगितले. जर आपल्या ऑनलाइन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता याबाबत चुकीची माहिती भरली गेली असेल, तर हमीपत्राचा नमुना अर्ज भरून केंद्रावर घेऊन जाण्याची महत्त्वाची सूचना उमेदवारांना करण्यात आली आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसाठी आवश्यक असल्याने, या वर्षी सीईटी कक्षामार्फतविद्यार्थी ही परीक्षा उत्तम पद्धतीने कसे देऊ शकतील, यासाठी हा प्रयत्न असल्याचे रायते यांनी सांगितले. 

उमेदवारांनी हे करू नये

  • इतर उमेदवार किंवा चाचणी केंद्र कर्मचाºयासोबत वाद घालू नका. परीक्षेच्या दिवशी प्राधिकरणाचा निर्णय अंतिम मानला जाईल.

परीक्षा लॅबमध्ये बायो-ब्रेकसाठी विनंती करू नका.

  • परीक्षा दिवसांत, चाचणी परीक्षा केंद्र / परीक्षा प्रयोगशाळा, केंद्रावर नियोजित बसण्याची जागा बदलण्याची विनंती करू नका.
  • परीक्षेत प्रत्येक उमेदवाराला एकदाच कच्च्या कामासाठी कागद दिला जातो. त्यामुळे मिळालेला कागद वाया घालवू नये, तसेच कागदपत्रांची देवाणघेवाण करू नका. पकडले गेल्यास उमेदवाराला परीक्षेतून बाद करण्यात येईल.

ही कागदपत्र आवश्यक

  • उमेदवाराचे आधार कार्ड
  • / ई-आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • भारतीय पासपोर्ट
  • ड्रायव्हिंगचा परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • फोटोसह बँक पासबुक
  • उमेदवाराचे छायाचित्रसह अधिकृत लेटरहेडवर गॅझेटेड ऑफिसरने जारी केलेला फोटो ओळख पुरावा
  • उमेदवाराचे छायाचित्रसह अधिकृत लेटरहेडवर लोक प्रतिनिधींनी जारी केलेला फोटो ओळख पुरावा-
  • उमेदवाराला मान्यताप्राप्त शाळा / महाविद्यालयाद्वारे जारी केलेले अलीकडील ओळखपत्र (तारखेनुसार वैध २०१८-१९)
टॅग्स :परीक्षाविद्यार्थी