तुर्भे गावात संरक्षक भिंत कोसळली
By Admin | Updated: July 4, 2014 04:14 IST2014-07-04T04:14:21+5:302014-07-04T04:14:21+5:30
तुर्भे गावातील संरक्षण भिंत आज सकाळी अचानक कोसळली. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

तुर्भे गावात संरक्षक भिंत कोसळली
नवी मुंबई : तुर्भे गावातील संरक्षण भिंत आज सकाळी अचानक कोसळली. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
गावातील तलावाजवळ असणाऱ्या जुन्या मार्केटजवळ ही घटना घडली. सकाळी येथील संरक्षण भिंत याठिकाणी खरेदीसाठी आलेल्या महिला व विक्रेत्यांच्या अंगावर कोसळली. अचानक झालेल्या अपघातामुळे या परिसरात धावपळ उडाली होती. अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. यामधील चार जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एका रुग्णास केईएम व एकास वाशीतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये विनीशा संदीप पाटील, रत्ना मोहन नाईक, सिटी नरेंद्रसिंग खेतवाल, निखील नरेंद्रसिंग खेतवाल (७ महिने ) व इतर दोन जणांचा समावेश आहे.
अपघातानंतर महापालिकेचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, भरत धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. महापौर सागर नाईक यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली व रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. (प्रतिनिधी)