रुग्णालयातून १० लाख चोरणारा सुरक्षारक्षक गजाआड
By Admin | Updated: October 29, 2014 22:08 IST2014-10-29T22:08:15+5:302014-10-29T22:08:15+5:30
रुग्णालयातून १० लाख चोरणारा सुरक्षारक्षक गजाआड

रुग्णालयातून १० लाख चोरणारा सुरक्षारक्षक गजाआड
र ग्णालयातून १० लाख चोरणारा सुरक्षारक्षक गजाआडमुंबई: रुग्णालयातील लॉकरमधून १० लाखांची रोख रक्कम लंपास करणार्या सुरक्षा रक्षकास भोईवाडा पोलिसांनी अटक केली. गणेश पालेकर असे या आरोपीचे नाव असून तो कुर्ला येथे राहणारा आहे. परेलमधील ग्लोबल रुग्णालयात ही घटना २४ ऑक्टोबरला घडली. रुग्णालयाच्या कार्यालयामधील सर्व कर्मचारी काम आटोपून सायंकाळी घरी गेले. त्यानंतर याठिकाणी सुरक्षा रक्षकांचे काम करणार्या पालेकरची याठिकाणी ड्यूटी लागली होती. रुग्णालयातील सर्व बाबी त्याला माहित असल्याने २४ तारखेला त्याने रुग्णालयातील कपाटामधून लॉकरच्या चाव्या काढल्या. त्यानंतर लॉकरमधून ९ लाख ७७ हजारांची रक्कम घेऊन पुन्हा लॉकर आणि कपाट व्यवस्थित बंद केले. दुसर्या दिवशी कर्मचारी कामावर आल्यानंतर त्यांनी लॉकर उघडले, असता लॉकरमधील रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. त्यानुसार त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. त्यानुसार पहिल्यांदा पोलिसांनी सर्व कर्मचार्यांची कसून चौकशी केली. मात्र कोणाकडून काहीही माहिती मिळत नव्हती. अखेर पोलिसांनी रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची पाहणी केली असता, लॉकर परिसरात हा सुरक्षा रक्षक फिरत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ाची कबुली दिली. या आरोपीकडून पोलिसांनी ९ लाख ७४ हजारांची रक्कम हस्तगत केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)