Join us

हमखास खोळंब्याची लोकल प्रवाशांना हमी; मध्य, हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 07:50 IST

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १३ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १३ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

हार्बर मार्ग

कुठे? मानखुर्द-नेरुळ अप आणि डाउन जलद मार्गावर.कधी? सकाळी ११:१५ ते दुपारी ४:१५ पर्यंत.परिणाम काय?या ब्लॉकदरम्यान मानखुर्द ते नेरुळ स्थानकांदरम्यानची सर्व लोकल वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. तसेच हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी १० ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करू शकतात.

मध्य रेल्वे कुठे? माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर. कधी? सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५  पर्यंत.परिणाम काय?: या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या  मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंडपुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.  

टॅग्स :लोकल