Join us

जीएसटी कपात, वाहन आवाक्यात; जोरात बुकिंग अन् झटक्यात वेटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:41 IST

सर्वसामान्यांना मोठा दिलासा : दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर खरेदीचा अंदाज

मुंबई : केंद्र सरकारने वाहनांवरील जीएसटी कर कमी केला असून घटस्थापनेपासून म्हणजेच सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. २२ किमती कमी होणार असल्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता असून शोरूममध्ये आतापासूनच बुकिंगसाठी ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडत असल्याचे चित्र आहे. अनेक वाहनांना तर दोन ते तीन महिन्यांचे वेटिंग असल्याचे दिसत आहे.

वाहनांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे सर्वसामान्यांचे वाहने घेण्याचे स्वप्न भंगले होते. ग्राहक किमती कमी होण्याची वाट पाहत होते. मात्र, आता जीएसटी कमी केल्यामुळे खरेदीचा उत्साह वाढला असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे.

आतापासूनच नोंदणी : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन घरासमोर उभे करण्यासाठी ग्राहकांकडून आधीच नोंदणी सुरू झाली आहे. येत्या दोन महिन्यांत वाहन विक्रीत लक्षणीय वाढ होणार असून दिवाळीपर्यंत हा आकडा प्रचंड वाढेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

२९%

१८%

पेट्रोल/

सीएनजी /एलपीजी कार १२०० सीसी

डिझेल कार, १५०० सीसी

३१%

२८%

१८%

१८%

दुचाकी ३५० सीसी पेक्षा कमी

जुना दर नवा दर

४०%

२८%

दुचाकी ३५० सीसी पेक्षा जास्त

जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे लहान वाहने स्वस्त झाली आहेत. त्यामुळे लहान वाहने किंवा कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मागणी वाढू शकते. दसरा आणि दिवाळीत बुकिंगचा ताण वाढणार असून लोकप्रिय मॉडेल्सचे वाहन घरी आणण्यासाठी ग्राहकांना दोन ते तीन महिने वेटिंगवर राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

ब्रिजेश पाठक, स्थानिक शोरूम चालक २० ते ५० हजारांची घट

जीएसटी कराच्या नव्या रचनेनुसार २५० हून कमी सीसी असलेल्या बाईक आणि १,२००हून कमी सीसीच्या चारचाकी वाहनांच्या खरेदीत वाढ होऊ शकते. या वाहनांच्या किमती २० ते ५० हजार रुपयांनी कमी होऊ शकतात.