चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.6 टक्के

By Admin | Updated: October 2, 2014 23:59 IST2014-10-02T23:59:06+5:302014-10-02T23:59:06+5:30

जागतिक अर्थकारणात झालेला सुधार आणि पाठोपाठ भारतीय अर्थव्यवस्थेत उमटलेले त्याचे पडसाद या पाश्र्वभूमीवर देशाच्या विकासदरात वाढ होण्याची प्रक्रिया सुरू झाली

The growth rate for the current fiscal is 5.6 percent | चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.6 टक्के

चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.6 टक्के

>मुंबई : जागतिक अर्थकारणात झालेला सुधार आणि पाठोपाठ भारतीय अर्थव्यवस्थेत उमटलेले त्याचे पडसाद या पाश्र्वभूमीवर देशाच्या विकासदरात वाढ होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, चालू आर्थिक वर्षात विकासदर 5.6 टक्के असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय सव्रेक्षण संस्था ‘फिच’ने व्यक्त केला आहे, तर त्या पुढील आर्थिक वर्षाकरिता अर्थात 2क्15-16 करिता विकासदर साडेसहा टक्के असेल, असेही भाकीत वर्तविले आहे. 
चार वर्षापासून सुरू असलेल्या मंदीचे सावट उठल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत सुधार दिसून आला. त्यापाठोपाठ आता देशात स्थिर सरकार आल्यानंतर आर्थिक सुधारणांची प्रक्रिया वेग धरेल, तसेच वातावरणात सुधार आल्यामुळे अनेक कंपन्यांनीही आता विस्तार योजना हाती घेतल्याने नव्या गुंतवणुकीला चालना मिळेल, याचा परिणाम विकासदर वाढीच्या रूपाने दिसून येईल, असे मत संस्थेने व्यक्त केले आहे. दरम्यान, मंगळवारी रिझव्र्ह बँकेने पतधोरण मांडतेवेळी विकासदराचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार, चालू आर्थिक वर्षात विकासदर साडेपाच टक्के असेल, तर आगामी आर्थिक वर्षात हा दर 6.3 टक्के इतका असेल.  (प्रतिनिधी)
 
4संस्थेनेही याच आकडय़ांच्या दरम्यान भाकीत वर्तविले आहे. विकासदर वाढण्यासाठी देशाच्या उत्पादन क्षेत्रने जोर पकडण्याची आवश्यकता असल्याचेही मत नोंदविले आहे.  

Web Title: The growth rate for the current fiscal is 5.6 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.