अनुदानाचे ७ कोटी पडून
By Admin | Updated: May 11, 2015 03:56 IST2015-05-11T03:56:50+5:302015-05-11T03:56:50+5:30
शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे एक महिन्यापूर्वी ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला आहे.

अनुदानाचे ७ कोटी पडून
मुंबई : शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे एक महिन्यापूर्वी ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला आहे. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हा निधी तसाच पडून आहे. हा निधी शाळांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करण्याची मागणी शाळांकडून होत आहे.
वेतनेत्तर अनुदानापोटी प्राप्त झालेला निधी संबंधित शाळांच्या बँक खात्यावर तातडीने जमा होणे अपेक्षित असते. परंतु ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे वाटपासाठी आलेला सुमारे ७ कोटींपेक्षा अधिक निधी पडून आहे. याबाबतचा संगणकीय प्रोग्राम तयार असूनही शाळांना व संस्थांना वेतनेत्तर अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. गतवर्षीही वेतनेत्तर अनुदानासाठी प्राप्त झालेल्या निधीचे १०० टक्के वाटप झालेले नव्हते. तसेच अनेक माध्यमिक शाळांना अद्यापही गतवर्षी मंजूर झालेले वेतनेत्तर अनुदान मिळालेले नाही.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, ४२७ प्राथमिक शाळांना वेतनेत्तर अनुदानापोटी यंदा २ कोटी ८८ लाख रुपये मिळाले आहेत. सदरच्या निधीचे वाटप अद्यापही शाळांना व संस्थांना झालेले नाही. प्राथमिक व माध्यमिक शाळांना तातडीने या निधीचे वाटप करण्याची मागणी शिक्षक परिषदेकडून शालेय शिक्षण सचिव नंदकुमार आणि मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक डी.बी. फडतरे यांच्याकडे करण्यात आली आहे.