नगर परिषदेत राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये गटबाजी
By Admin | Updated: July 5, 2014 23:10 IST2014-07-05T23:10:20+5:302014-07-05T23:10:20+5:30
सभापती निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 पैकी 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गटाचा दावा करून यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला आहे.

नगर परिषदेत राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये गटबाजी
अंबरनाथ : सभापती निवडणुकीत विश्वासात न घेतल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 पैकी 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गटाचा दावा करून यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला आहे. तसेच अंबरनाथ नगर परिषदेत या गटाच्या स्वतंत्र गटनेत्याला मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अंबरनाथ नगर परिषदेत नगराध्यक्षपद शिवसेनेच्या वाटय़ाला असून सर्व सभापतीपदे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं यांच्या महाआघाडीकडे आहे. मे महिन्यात झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गटनेत्या वंदना पाटील यांनी निवडणुकीतील बंडखोरी रोखण्यासाठी काही नगरसेवकांना महत्त्वाच्या समितीमधून वगळले होते. त्यामुळे नगरसेवक अशोक गुंजाळ, दिलीप पवार, सुनीता पाटील, लतिका कोतेकर आणि नासीर कुंजाली यांनी स्वतंत्र गट स्थापण्याचा प्रय} सुरू केला आहे. स्वतंत्र गटाला मान्यता मिळावी, यासाठी अर्ज केला आहे. या गटाला मान्यता मिळाली तरी तो गट राष्ट्रवादी पक्षाशी संलग्न राहणो अवघड आहे. कारण याआधी राष्ट्रवादीने वंदना पाटील यांना गटनेतेपदाचे पत्र दिले आहे. दुसरीकडे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी 1/3 नगरसेवकांनी गटाची मागणी केल्यावर नवीन गटाला मान्यता मिळते. राष्ट्रवादीत असलेल्या पण स्वतंत्र गटाच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्त काय निर्णय देतात, यावर पालिकेतील गटनेतेपदाचा वाद सुटणार आहे. दरम्यान, अंबरनाथ नगर परिषदेत या स्वतंत्र गटनेतेपदाबाबत संभ्रम असून आयुक्तांच्या निर्णयाला अधीन राहूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)