गटा-गणांत ७४ अर्ज बाद
By Admin | Updated: January 14, 2015 23:17 IST2015-01-14T23:17:45+5:302015-01-14T23:17:45+5:30
पालघर जिल्हापरिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी झाली

गटा-गणांत ७४ अर्ज बाद
पालघर : पालघर जिल्हापरिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारी अर्जाची बुधवारी छाननी झाली. जि.प.च्या ५७ गटांसाठी ४२७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी २८ अर्ज बाद झाले असून ३९९ अर्ज वैध ठरले आहेत. तर पं.स.च्या ११४ गणांसाठी ८१२ अर्ज दाखल झाले. त्यापैकी ४६ अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविल्याने ३६६ अर्ज वैध ठरले आहेत. पालघर जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुका प्रथमच होत आहेत. पालघर, वसई, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा या आठ पंचायत समितीच्याही निवडणुका होत आहेत. (वार्ताहर)