नाना शंकरशेट यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:17 IST2017-08-01T03:17:09+5:302017-08-01T03:17:09+5:30

नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या १५२व्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका सभागृहातील त्यांच्या प्रतिमेस महापौर विश्वनाथ महाडेश्वर

Greetings to Nana Shankar Shet | नाना शंकरशेट यांना अभिवादन

नाना शंकरशेट यांना अभिवादन

मुंबई : नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या १५२व्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका सभागृहातील त्यांच्या प्रतिमेस महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापौर म्हणाले, नामदार नाना शंकरशेट यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली. मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी अतुलनीय कार्य केले आहे. नामदार नाना शंकरशेट यांचे कार्य लक्षात घेता, नामदार जगन्नाथ शंकरशेट प्रतिष्ठानच्या वतीने आपण जी शाळा सुरू करीत आहात, ती शाळा स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेली अशी शाळा होईल, असा आशावादही महापौरांनी व्यक्त केला. नानांचे भव्य असे स्मारक होत असताना महापालिका त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Greetings to Nana Shankar Shet