गिरीश कर्नाड यांना टाटा लिटरेचर लाइव्हचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:05 IST2017-11-02T01:05:09+5:302017-11-02T01:05:24+5:30
सुप्रसिद्ध भारतीय नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाइव्हचा ‘जीवन् गौरव पुरस्कार २०१७’ जाहीर झाला आहे.

गिरीश कर्नाड यांना टाटा लिटरेचर लाइव्हचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई : सुप्रसिद्ध भारतीय नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांना यंदाचा टाटा लिटरेचर लाइव्हचा ‘जीवन् गौरव पुरस्कार २०१७’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण टाटा लिटरेचर लाइव्हच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात १९ नोव्हेंबर रोजी, नरिमन पॉइंट (मुंबई) येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आटर््स येथे होईल.
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड हे त्यांच्या साहित्य रचनेबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत. आजच्या आधुनिक काळातील सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित ऐतिहासिक, पौराणिक आणि लोकसाहित्य त्यांनी निर्माण केले. त्यामध्ये विचारवंतांनी गौरविलेल्या ययाती (१९६१), ऐतिहासिक तुघलक (१९६४) तसेच हयावदना (१९७१), नागा-मंडळ (१९८८) आणि तालेदंड (१९९०) या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे.
याविषयी गिरीश कर्नाड यांनी सांगितले की, नाटककार त्याच्या समोरील सर्व प्रेक्षकांना संबोधित करत असतो. त्याला ऐकण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या शेकडो व्यक्ती असतात, त्यांचे लक्ष वेधणे एक आव्हान असते; आणि त्याला त्या समूहातील प्रत्येक सदस्याची पूर्तता एकाचवेळी आणि अर्थपूर्णपणे करावी लागते. याशिवाय, या प्रक्रियेत सहभागी झालेले दिग्दर्शक, सहकारी, पोशाख सहायक यांची संपूर्ण गुंतवणूक लागते. म्हणूनच नाटक हे क्लिष्ट जगत आहे. शब्दामध्ये विणलेल्या मानवी संबंधाचे ते एक बुद्धिमान नेटवर्क आहे, म्हणूनच जेव्हा सर्वांत शेवटी कोणीतरी यशस्वी झाला म्हणून सांगितले जाते तो फारच आनंददायी अनुभव आहे. एक नाटककार ज्याच्यासाठी झटतो तो हा क्षण आहे.
टाटा लिटरेचर लाइव्हचे संस्थापक व संचालक अनिल धारकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत आहे. भारतात येणाºया आधुनिक युगाची नांदी १९६० काळात त्यांच्या साहित्यात होती, त्या काळात त्यांनी भारतीय कला आणि साहित्य जगताला आकार देण्यास आणि त्याची वृद्धी करण्यास मोठी मदत केली.