मुंबईकरांना मोठा दिलासा; ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कातील ३१४ निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 19:30 IST2021-12-07T19:30:44+5:302021-12-07T19:30:58+5:30

कोविडचा नवीन व्हेरियंत असलेला ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत असल्याचे परदेशात आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोना बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील लोकांची तातडीने चाचणी करण्यात येत आहे.

Great relief to Mumbai; 314 negatives in contact with omicron Patient | मुंबईकरांना मोठा दिलासा; ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कातील ३१४ निगेटिव्ह 

मुंबईकरांना मोठा दिलासा; ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कातील ३१४ निगेटिव्ह 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - ओमायक्रोनची लागण झालेले दोन रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर टेन्शन वाढले आहे. मात्र या दोघांच्या जवळच्या संपर्कातील ४० आणि परदेशातून आल्यानंतर कोविड बाधित आढळून आलेल्या सर्व रुग्णांच्या संपर्कातील असे एकूण ३१४ लोकांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या ११ बाधित रुग्णांच्या जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल प्रतिक्षेत आहे. 

ओमायक्रॉन संक्रमित व अन्य देशांतून १० नोव्हेंबरपासून आतपर्यंत पाच हजार ५१० प्रवाशी मुंबईत आले आहेत. या प्रवाशांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार क्वारंटाईन करुन वॉर्ड वॉर रूममार्फत त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तर काहींची कोविड चाचणी करण्यात आले असून यापैकी २० प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर त्यांच्या संपर्कातील नऊ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी परदेशातून आलेल्या दोघांना ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित १४ लोकांचे अहवाल निगेटिव्ह असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पालिकेला आता उर्वरित ११ लोकांच्या अहवालाची प्रतीक्षा असून दोन दिवसांनी चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. 

निकट संपर्कातील सर्व निगेटिव्ह... 

कोविडचा नवीन व्हेरियंत असलेला ओमायक्रॉन विषाणू वेगाने पसरत असल्याचे परदेशात आढळून आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोरोना बाधित रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील लोकांची तातडीने चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार २९ बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३१४ लोकांची कोविड चाचणी महापालिकेने तातडीने केली. मात्र यापैकी कोणालाच कोरोनाची लागण झालेली नाही, असे समोर आल्याने दिलासा मिळाला आहे. 

सेव्हन हिल्स रुग्णालयात दीडशे खाटा... 

मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात ओमायक्रॉन बाधित रुग्ण व संशयितांसाठी अडीशे खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी रुग्णालयात प्रत्येकी दहा खाटा राखून ठेवण्यास सांगण्यात आल्या आहेत. सध्या कोविड बाधित आढळून आलेले आणि ओमायक्रॉनची लागण झालेल्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. 

पुणे येथे होतेय जीनोम चाचणी... 

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग चाचणीची यंत्रणा आहे. मात्र या ठिकाणी एकावेळी ३५० नमुने ठेवावे लागतात. तर पुणे येथील एनआयव्ही संस्थेत केवळ ३० नमुन्यांची चाचणी शक्य होते. त्यामुळे तातडीने अहवाल मिळावेत यासाठी सर्व बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 

Web Title: Great relief to Mumbai; 314 negatives in contact with omicron Patient