चेंबूरवरून महायुतीत चढाओढ

By Admin | Updated: September 18, 2014 01:05 IST2014-09-18T01:05:29+5:302014-09-18T01:05:29+5:30

चेंबूर विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी महायुतीतल्या रिपाइं, भाजपा आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

Great fight in Chembur | चेंबूरवरून महायुतीत चढाओढ

चेंबूरवरून महायुतीत चढाओढ

मुंबई : चेंबूर विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी महायुतीतल्या रिपाइं, भाजपा आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपामधून या जागेसाठी स्थानिक पातळीवरील अनेक तुल्यबळ इच्छुक असून, या सर्वानी आपापल्यापरीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गेल्या निवडणुकीत भाजपाने ही जागा लढवली होती. त्या वेळी महायुतीत नसलेली रिपाइं भाजपाच्या विरोधात लढली होती. यंदा महायुतीत सहभागी झालेल्या रिपाइंने या जागेवर दावा केला आहे. 
या मतदारसंघावरील दलित-बहुजन आणि मराठी मतदारांचे वर्चस्व हा रिपाइंच्या मागणीचा आधार आहे. रिपाइंतर्फे दीपक निकाळजे येथून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र रिपाइंच्या चेंबूरवरील दाव्याने व आग्रहाने स्थानिक पातळीवरील भाजपा पदाधिका:यांमध्ये अस्वस्थता आहे. 
येथील भाजपाच्या पदाधिका:यांनीही आपल्या पक्षप्रमुखांकडे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करत आपापले अर्ज सादर केले आहेत. या पाश्र्वभूमीवर महायुती अभंग राहिल्यास ही जागा कोणत्या घटक पक्षाला सुटते, रिपाइंला किंवा भाजपाला सुटल्यास स्पर्धक घटक पक्षांच्या पदाधिकारी-इच्छुकांची भूमिका काय असेल यावरून मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे.
चेंबूरसाठी भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची रांग लागली आहे. त्यात आघाडीवर आहेत नगरसेवक विठ्ठल खरटमोल. त्यांच्या मागोमाग अनिल ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात आलेले अनिल चौहान, कांता नलावडे ही अन्य महत्त्वाची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. तर शिवसेनेकडून सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळुंज, नगरसेवक फातर्फेकर हेही इच्छुक असल्याचे समजते. यातील कोणते इच्छुक उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात याकडे चेंबूरकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Great fight in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.