चेंबूरमध्ये धान्याचा अवैध साठा जप्त
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:36+5:302015-08-26T23:32:36+5:30
चेंबूरमध्ये धान्याचा अवैध साठा जप्त

चेंबूरमध्ये धान्याचा अवैध साठा जप्त
च ंबूरमध्ये धान्याचा अवैध साठा जप्तमुंबई : चेंबूर येथील एका गाळ्यावर टाकलेल्या धाडीत तांदूळ व गव्हाचा काळ्या बाजारात नेण्यात येणारा अवैध साठा अन्न व नागरी पुरवठा विभागाने जप्त केला आहे. याप्रकरणी मंगळवारी पाच जणांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.चेंबूरच्या आकाशदिप बिल्डींग येथील एका इमारतीच्या गाळा आणि खोलीत अन्न सुरक्षा योजनेतील ६ हजार ५० किलो तांदूळ (१२१ गोणी) व १ हजार ६०० किलो गहू (३२ गोणी) असा साठा अवैधरित्या साठविला होता. हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी मालमोटारीमध्ये (गाडी क्रमांक - एमएच ११ एएल ४२६०) भरत असताना नागरी पुरवठा कार्यालयाच्या फिरत्या पथकाने साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत ८ लाख ७१ हजार ५०० रुपये इतकी आहे.तरी याप्रकरणी फिरत्या पथकाने टेंपोचालक श्रीकांत हणमंत धुलवडे व वाहन मालक राजेंद्रकुमार काकडे, गाळ्याचे मालक साक्षी महावीर अग्रवाल व जे.बी.अग्रवाल आणि राजेश नावाच्या व्यक्तिविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अन्वये व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.......................