आजी- माजी अध्यक्ष, संचालकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
By Admin | Updated: May 5, 2015 00:06 IST2015-05-05T00:06:09+5:302015-05-05T00:06:09+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन कंबर कसली आहे. त्यासाठी आजी,

आजी- माजी अध्यक्ष, संचालकांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
जितेंद्र कालेकर, ठाणे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन कंबर कसली आहे. त्यासाठी आजी, माजी संचालक, अध्यक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातील १४ तालुक्यांच्या तहसिल कार्यालयांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यन्त मतदार होणार आहे.
राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार पॅनल’मध्ये प्रभारी अध्यक्ष देविदास पाटील यांच्यासह माजी अध्यक्ष खासदार कपिल पाटील यांचे पुतणे प्रशांत पाटील भिवंडीतून तर कल्याणमधून विद्यमान संचालक अनंत शिसवे, माजी अध्यक्ष अशोक पोहेकर, इतर मागासवर्गीयांतून माजी अध्यक्ष आर. सी. पाटील यांचे पुत्र अरुण पाटील, संचालिका भावना डुंबरे, विद्या वेखंडे तर पंतसंस्थेमधून संचालक भाऊ कुऱ्हाडे आणि शहापूरातून ठाणे ग्रामीण राष्ट्रवादीचे अध्यक्ष दशरथ तिवरे, ‘लोकशाही सहकार’ पॅनलमधून शिवाजी शिंदे, कमलाकर टावरे , अनिल मुंबईकर, राजेश पाटील, फिलीप मस्तान आणि रेखा पष्टे हे लढत देत आहेत.