नेरळपाड्यातील बेकायदा बांधकामावर ग्रामपंचायतीचा हातोडा

By Admin | Updated: May 15, 2014 01:31 IST2014-05-15T01:31:45+5:302014-05-15T01:31:45+5:30

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाडा भागात असलेल्या जुन्या नाल्याच्या बाजूला असलेल्या पुलाचे बेकायदा बांधकाम सुरु होते.

Gram Panchayat hammer on illegal construction in Nerlapad | नेरळपाड्यातील बेकायदा बांधकामावर ग्रामपंचायतीचा हातोडा

नेरळपाड्यातील बेकायदा बांधकामावर ग्रामपंचायतीचा हातोडा

नेरळ : नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाडा भागात असलेल्या जुन्या नाल्याच्या बाजूला असलेल्या पुलाचे बेकायदा बांधकाम सुरु होते. नेरळ -माथेरान रेल्वे मार्गावरील पाणी पावसाळ्यात या पुलावरून जात असताना तेथे लहान पूल बांधून पाणी अडविण्याचा प्रयत्न सुरु होता. याबाबत रहिवाशांनी नेरळ ग्रामपंचायतकडे पुलाच्या कामाची चौकशी केले. मात्र सुरु असलेले पुलाचे बांधकाम बेकायदा असल्याने ते तोडण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकाने कार्यवाही केली. रेल्वेने बांधलेल्या लहान पुलाखालून देखील पावसाळयात जास्त पाऊस असेल तर पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक रहिवाशी जीव मुठीत घेवून राहतात. अशावेळी पुन्हा रेल्वे पुलाच्या खाली रस्ता करण्यासाठी बांधण्यात येणारा पूल म्हणजे पावसाळ्यात तेथे महापुराला निमंत्रण देण्यासारखे आहे. परिसरातील रहिवाशांनी याबाबत नेरळ ग्रामपंचायतकडे सदर पुलाच्या बेकायदा बांधकामबाबत तक्रार केली आहे. ग्रामपंचायतीने घटनास्थळी जावून पाहणी केली आणि पुलाच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेवटी पावसाळी पाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून त्या पुलाचे बेकायदा बांधकाम तोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने बैठकीत घेतला. त्यानुसार लगेच ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने जेसीबी मशीन मागवून आज मंगळवारी दुपारी पाडा भागातील बेकायदा बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. मशीनसह ग्रामपंचायतीचे अतिक्रमण विरोधी पथक घटनास्थळी हजर होते. त्यांनी ही कार्यवाही करतांना बांधकाम व्यावसायिक लियाकत हमीद सहेद यांनी पुलाचे बेकायदा बांधकाम केल्याचे सांगितले. त्यांनी मुंबई - पुणे मेन रेल्वे मार्गालगत बांधलेल्या दोन इमारतींकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने पुलाचे बेकायदा बांधकाम केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. जी. डोंगरे यांनी दिली.

Web Title: Gram Panchayat hammer on illegal construction in Nerlapad