आज रंगणार गोविंदा रे गोपाळा!
By Admin | Updated: August 18, 2014 01:13 IST2014-08-18T01:13:21+5:302014-08-18T01:13:21+5:30
येणार ... येणार म्हणून सारेच प्रतीक्षेत असलेला गोपाळकाला उत्सव उद्या होणार आहे

आज रंगणार गोविंदा रे गोपाळा!
जयंत धुळप, अलिबाग
येणार ... येणार म्हणून सारेच प्रतीक्षेत असलेला गोपाळकाला उत्सव उद्या होणार आहे. त्यानिमित्ताने गोविंदा रे गोपाळाच्या तालावर गोपाळ दहीहंडी फोडून उत्सव जल्लोषात साजरा करणार आहेत. दहीकाल्याची तयारी रात्री उशिरापर्यंत चालू होती. श्रीकृष्ण जयंती आणि गोकुळाष्टमीच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात एकूण २ हजार २४९ ठिकाणी सार्वजनिक तर ८ हजार ६०३ ठिकाणी खाजगी दहिहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहूनच यंदा गोपाळकाला व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अनेक गोविंदा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील ७७ गावे ही संवेदनशील असल्याने त्या ठिकाणांसह जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या नियमित मनुष्यबळासोबतच राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या अलिबाग, पेण व श्रीवर्धन येथे तैनात करण्यात आल्या आहेत. ३०० पुरूष तर ५० महिला होमगार्ड देखील बंदोबस्ताकरिता या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.