Join us  

'शासनाने कुक्कुटपालन व्यवसायाला बँकेकडून घेतलेल्या कर्जात सूट व आर्थिक नुकसान भरपाई द्यावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 6:11 PM

राज्यातील सुमारे ९० टक्के पोल्ट्री व्यवसाय हा कंत्राटी पद्धतीने चालतो.त्यामध्ये पोल्ट्री कंपनी शेतकऱ्यांना कोंबड्यांची एका दिवसाची पिल्ले आणि खाद्यही पुरवतात.

मुंबई-  सध्या कोरोना या संसर्गजन्य रोगाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. कुकूटपालन व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.कुकुट उत्पादनांची मागणी कमी झाल्याने लाखो कोंबड्यांच्या पोषणाचा व अंड्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न उभा राहिला आहे.महाराष्ट्रात ग्रामीण अर्थकारणातील उलाढालीत कुकुटपालन व्यावसायाचे स्थान महत्वपूर्ण आहे. शेतीला पूरक व जोडधंदा आहे.

राज्यातील सुमारे ९० टक्के पोल्ट्री व्यवसाय हा कंत्राटी पद्धतीने चालतो.त्यामध्ये पोल्ट्री कंपनी शेतकऱ्यांना कोंबड्यांची एका दिवसाची पिल्ले आणि खाद्यही पुरवतात. शेतकरीही पिल्ल ४० ते ४५ दिवसांनी कंपनीला परत देतात. एका वर्षातून पक्षांच्या सहा बॅचेस निघतात.परंतू आता चिकनच खपत नसल्याने या शेतकऱ्यांचे पुढच्या बॅचेस येणार नाही आणि सध्याच्या  बॅचेस पक्षांपोटी कंपन्या मिळणारे पेमेंट ही रखडले आहे.

यासाठी राज्य सरकारने हे कुकूटपालन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत करण्याची गरज आहे अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे ई-मेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते अँड.अमोल मातेले यांनी लोकमतला सांगितले.सदर प्रकरणी योग्य निर्णय घेऊन कुकुटपालन व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलीे.

देशभरात या पुरवठा उद्योगातून दररोज एक कोटी बॉयलर कोंबडी उपलब्ध होतात.एका कंपनीचे उत्पादन खर्च सुमारे दीडशे रुपये असून सध्या कोंबडी व अंड्याचे दर कमालीचे घसरले आहेत. कुकूटपालन व्यवसाय तोट्यात आहे. यासाठी कच्चामाल म्हणून मका आणि सोयाबीनचा वापर केला जातो. व्यवसाय अडचणी असल्यामुळे मका आणि सोयाबीन दरही पडले आहेत.त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक यांचे कर्ज माफ करावे.कोरोना व्हायरसमुळे ग्रामीण भागात चिकनवर अघोषित बहिष्कार टाकण्यात आल्याने चिकानची दुकाने बंद झाली आहे असा प्रकार शहरातही आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीला जोडधंदा म्हणून  कुकुटपालन व्यवसाय सुरू केला आहे.

मात्र चिकनची मागणी पूर्णपणे घटल्याने शेतकऱ्यांच्या मुलांना कुकुट पालन व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे.या व्यवसायासाठी लाखो रुपये कर्ज बँका व पतसंस्था घेण्यात आली आहे. याचा हप्ता काय मात्र व्याजही भरू शकत नाही.त्यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक फटका मागील फेब्रुवारी महिन्यापासून बसला आहे.  सरकारने कुक्कुटपालन व्यवसायाचे कर्ज माफ करावे व शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाईम देण्यात यावी अशी मागणी केल्याचे अँड.अमोल मातेले यांनी सांगितले.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकारमुंबई