पाणीपुरवठ्यातील भ्रष्टाचारात सरकारी बाबू

By Admin | Updated: December 17, 2014 23:03 IST2014-12-17T23:03:18+5:302014-12-17T23:03:18+5:30

येथील मापगाव-मुशेत बहिरोळ पाणीपुरवठा जलवाहिनी टाकण्याच्या कामात बनावट कागदपत्रे तयार करुन चार लाख ९० हजार रुपयांचा

Government servants in the corruption of water | पाणीपुरवठ्यातील भ्रष्टाचारात सरकारी बाबू

पाणीपुरवठ्यातील भ्रष्टाचारात सरकारी बाबू

अलिबाग : येथील मापगाव-मुशेत बहिरोळ पाणीपुरवठा जलवाहिनी टाकण्याच्या कामात बनावट कागदपत्रे तयार करुन चार लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग पंचायत समितीमधील कनिष्ठ लिपिक एन. डी. जाधव, स्टॅम्पपेपरवर नाव असणारे रेवस ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र पाटील, कुसुंबळे येथील संकेत मजूर सहकारी संस्था मर्या. चे अध्यक्ष, पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विषयाशी संबंधित कामे हाताळणारे सर्व कर्मचारी आणि अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर. एस. माळी, पंचायत समितीचे कार्यालयीन अधीक्षक, मापगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुदेश राऊत या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. हा भ्रष्टाचार मापगाव ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत खोत यांनी तक्रार देऊन उजेडात आणला. (प्रतिनिधी)

Web Title: Government servants in the corruption of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.