सरकारला दिबा पाटील यांच्या कर्तृत्वाचा विसरच
By Admin | Updated: June 23, 2015 23:14 IST2015-06-23T23:14:09+5:302015-06-23T23:14:09+5:30
नवी मुंबई ही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या त्यागाने उभी राहिली आहे . याठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांच्यामुळेच न्याय मिळाला. अशा राष्ट्रपुरु षाच भव्य स्मारक नवी मुंबई मध्ये उभे

सरकारला दिबा पाटील यांच्या कर्तृत्वाचा विसरच
वैभव गायकर, पनवेल
नवी मुंबई ही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या त्यागाने उभी राहिली आहे . याठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांच्यामुळेच न्याय मिळाला. अशा राष्ट्रपुरु षाच भव्य स्मारक नवी मुंबई मध्ये उभे राहिलेच पाहिजे, त्याकरिता आम्ही आखिल आगरी परिषदेच्या वतीने शासनाकडे वेळोवेळी मागणी केली असल्याचे प्रकल्पग्रस्त नेते शाम म्हात्रे यांनी सांगितले.
पाचवेळा आमदार, दोनदा खासदार, राज्याचे विरोधीपक्ष नेते अशी पदे भूषविलेल्या दिनकर बाळू उर्फ दि. बा. पाटील यांची बुधवारी द्वितीय पुण्यतिथी. नवी मुंबईमधील सिडकोविरोधात छेडलेला साडेबारा टक्क्यांचा लढा दिबांच्या नेतृत्वात लढण्यात आला. अशा लढवय्या नेत्याचे कर्तृत्व सरकारकडून नेहमीच दुर्लक्षिले गेले आहे.
नवी मुंबई हे शहर आज आंतरराष्ट्रीय शहराकडे वाटचाल करीत आहे. मेट्रो, मोठे रेल्वे स्थानक , गोल्फ कोर्स, सेन्ट्रल पार्क, आंतरराष्ट्रीय विमानतळ, सेंट्रल पार्क, सिडको एक्झिबिशन सेंटर, अर्बन हाट आदी अनेक प्रकल्प सिडकोने याठिकाणी उभारले आहेत. मात्र एकही प्रकल्पाला सिडकोने दिबांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबाचे नाव द्यावे, तसेच किल्लेगावठाण चौकात दिबांचा पुतळा उभारून याठिकाणच्या चौकाला हुतात्मा चौक हे नाव द्यावे अशी मागणी म्हात्रे यांनी यावेळी आहे .
राज्याचे विरोधीपक्ष नेते असताना संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न दिबांनी शिताफीने मांडले. लोकसभेत देखील ते सतत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत राहिले. साडेबारा टक्क्यांचा लढाच नाही तर प्रकल्पग्रस्तांच्या लहान प्रश्नांसाठी ते आजवर रस्त्यावर उतरत राहिले. प्रकृती अस्वस्थ असताना देखील अॅम्ब्युलन्सने ते आंदोलनाठिकाणी येत असत. अशा महान नेत्याचे नवी मुंबईतसाधे स्मारक देखील सिडकोने उभारले नाही. दिबांचे गाव जासई याठिकाणावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हे वगळता नवी मुंबईत दिबांचे स्मरण होईल अशी वास्तू उभारण्यात आलेली नाही.