Join us  

सरकारी कर्मचारी रजा आंदोलन मागे घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 5:35 AM

राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.

- विशेष प्रतिनिधीमुंबई : राजपत्रित अधिकारी महासंघाने ५ जानेवारी रोजी सामूहिक रजा आंदोलनाची घोषणा केली असली तरी शुक्रवारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सातवा वेतन आयोग राज्यात लागू केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मात्र, पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीबाबत महासंघ ठाम असल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर, आम्ही सातवा वेतन आयोग दिलेला आहे आणि अन्य मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले व ५ जानेवारीचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.महासंघाच्या पदाधिकाºयांची २ जानेवारी रोजी बैठक घेऊन ५ तारखेच्या आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. शिष्टमंडळात ग. दि. कुलथे, विनोद देसाई, समीर भाटकर, विष्णु पाटील आदींचा समावेश होता.

टॅग्स :मंत्रालयसरकार