Join us  

'जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध', वाढवण बंदरासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 8:15 PM

Chief Minister Uddhav Thackeray : डहाणू प्राधिकरण व पोलिस जबरदस्तीने व दमदाटी करून सर्व्हे करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

मुंबई: पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या  वाढवण बंदरा संदर्भात स्थानिक मच्छिमार संघटना तसेच वाढवण बंदर विरोधी संघर्ष कमिटी प्रतिनिधींसमवेत आज दुपारी सह्याद्री अथिती गृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न झाली. तत्पूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक झाली.

या बैठकीत वाढवण बंदरामुळे स्थानिकांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांचा रीतसर आढावा वाढवण बंदर विरोधी समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी मांडला. तर वाढवण बंदरामुळे येथील किनारपट्टी वरील मच्छिमार कसा उद्वस्त होणार आहे याचा सविस्तर आढावा महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो सरचिटणीस किरण कोळी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला.

डहाणू प्राधिकरण व पोलिस जबरदस्तीने व दमदाटी करून सर्व्हे करत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. दैनिक लोकमतने देखिल वाढवण बंदरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा उहापोह करून शासनाचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र सरकार नेहमीच मच्छिमार बांधवांसोबत असून येथील मच्छिमार बांधवांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले. शासन हे जनते सोबत असून जे जनतेला हवे तेच देण्याचा शासनाचा प्रयत्न असेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपल्या कडील कागदपत्रे व पुरावे सादर करा.आपण डहाणू प्राधिकरणा बरोबर परत लवकरच बैठक आयोजित करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार रवींद्र फाटक, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, तसेच नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, चिटणीस. ज्योती रमेहेर,वाढवण बंदर विरोधी संघर्ष कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव वैभव वझे, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, वाढवण ग्रामपंचायत सरपंच विनिता राऊत, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोल्यासो, सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजन मेहेर महिला संघटक पौर्णिमा मेहेर, फिलिप मस्तन, ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल  उपाध्यक्ष वैभव भोईर, ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ अध्यक्ष जयकुमार भय, आदिवासी ऐकता परिषदेचे अध्यक्ष कळू राम धोडदे, विजय विंडे, भुवनेश्वर धनू, मोरेश्वर पाटील, मिलिंद राऊत, वैभव भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई