सत्ता मिळाली... सिंहासन गमावले
By Admin | Updated: May 8, 2015 00:33 IST2015-05-08T00:33:32+5:302015-05-08T00:33:32+5:30
महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळविल्या. परंतु स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे अपक्ष नगरसेवकास महापौर व

सत्ता मिळाली... सिंहासन गमावले
सांगली : दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलने १५ जागा जिंकून सत्ता स्थापन केली. माजी मंत्री पतंगराव कदम व विशाल पाटील यांच्या रयत सहकार परिवर्तन पॅनेलने धक्का देत सहा जागांवर विजय मिळविला. माजी मंत्री मदन पाटील यांचा पराभव करत त्यांचे चुलत बंधू विशाल पाटील यांनी धक्कादायक विजय नोंदविला, तर जतचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र मनोज यांनाही कदम गटाच्या विक्रम सावंत यांनी चितपट केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेने स्थापन केलेल्या शेतकरी सहकारी पॅनेलने दोन बिनविरोध जागांसह १५ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांनी एकत्र येऊन हे पॅनेल तयार केले होते. दुसरीकडे काँग्रेसचे माजी मंत्री आ. पतंगराव कदम आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील रयत पॅनेलला अपेक्षेपेक्षा चांगल्या जागा मिळाल्या. ‘रयत’ने मिरज, जत, तासगाव सोसायटी गटासह मजूर, गृहनिर्माण संस्था गटात धक्कादायक विजयांची नोंद केली.
कोल्हापूर : ‘जिल्ह्याची आर्थिक नाडी’ अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसनेच बाजी मारली. त्यामुळे पाच वर्षांनंतर बँकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा या दोन पक्षांच्या ताब्यात आल्या आहेत.
बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांपैकी चार जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. त्याच्यासह राष्ट्रवादीला सात, काँग्रेसला सहा, विनय कोरे यांना दोन, अपक्षांना तीन, तर मंडलिक गटास एक जागा मिळाली. शिवसेना-भाजपने सहा उमेदवार उभे केले होते. त्यांना एकाच जागेवर यश मिळाले. गगनबावडा संस्था गटातील निकाल राखीव ठेवला आहे. यापूर्वी एकतर्फी सत्ता असलेल्या बँकेत ‘राष्ट्रवादी’च्या बरोबरीने काँग्रेसही मजबूत झाल्याचे चित्र या निकालातून दिसले.
रत्नागिरी : जिल्हा बॅँक निवडणुकीत मतदारांनी सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा सहकार पॅनेलच्याच हाती सोपविल्या आहेत. २१ पैकी २० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलला १५ जागांवर विजय मिळाला असून, बिनविरोध निवड झालेल्या एका जागेमुळे सहकारच्या संचालकांची संख्या १६ झाली आहे. त्यामुळे डॉ. तानाजी चोरगे पुन्हा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गतवेळी दोन संचालक असलेल्या शिवसेनेने मुसंडी मारत पाच जागा पटकावल्या.
गुरुवारी सकाळी आठ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत सभागृहात
बॅँक निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यानंतर तासाभरात पहिले सात निकाल लागले. त्यात शिवसेनेला चार जागा मिळाल्याने शिवसंकल्प पॅनेलचा हुरूप वाढला आणि काही काळ सत्ताधारी सहकार पॅनेलमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र, त्यानंतर सहकार पॅनेलची अनेक जागांवर सरशी झाली.
पुढील निकालांमध्ये मात्र सहकार पॅनेलची सरशी झाली. सेनेच्या जागा चारवरून पाचपर्यंतच पोहोचल्या,
तर सहकार पॅनेलने तीन जागांवरून
१६ जागांपर्यंत मजल मारली. (प्रतिनिधी)