गजबजल्या गिरगावच्या गल्ल्या!
By Admin | Updated: September 7, 2014 01:13 IST2014-09-07T01:13:49+5:302014-09-07T01:13:49+5:30
गणपतींसाठी मुंबईचा चाकरमानी जसा कोकण गाठतो, त्याप्रमाणो अस्सल मराठमोळा मुंबईकर गिरगावात अवतरतो.

गजबजल्या गिरगावच्या गल्ल्या!
राज चिंचणकर ल्ल मुंबई
गणपतींसाठी मुंबईचा चाकरमानी जसा कोकण गाठतो, त्याप्रमाणो अस्सल मराठमोळा मुंबईकर गिरगावात अवतरतो. काळाच्या ओघात गिरगावातल्या मराठी कुटुंबांनी उपनगरात आश्रय घेतला असला, तरी गणपतीच्या दिवसात मात्र हाच मुंबईकर गिरगावची वाट चालू लागतो. गिरगावच्या आडव्या चाळी पाडून त्यांचा उभा विकास होत असला, तरी त्याचा परिणाम गणोशोत्सवावर झालेला नाही आणि त्यामुळे साहजिकच गिरगावातला गणोशोत्सव आपली जुनी परंपरा राखत साजरा होताना दिसतो. यंदाही ही प्रथा कायम असल्याचे दिसून येत असून, ऐन गणपतीच्या दिवसांत अखिल गिरगावच्या गल्ल्या उत्साहाने गजबजून गेल्या आहेत.
गिरगावच्या केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांनी शतकापूर्वी सार्वजनिक गणोशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि हा उत्सव गिरगावकरांनी पुढील पिढय़ांत संक्रमित केला. गिरगावात ज्या काही चाळी सध्या उरल्या आहेत, त्यात हा गणोशोत्सव साजरा होत आहेच; परंतु त्याचबरोबर इथल्या नव्याने उभारलेल्या इमारतींमधूनही गणपतीची उत्साहाने आराधना केली जात आहे. पश्चिमेच्या चर्नी रोड स्थानकापासून पूर्वेकडील भुलेश्वर्पयत आणि दक्षिणोच्या चंदनवाडीपासून उत्तरेच्या ग्रांट रोडर्पयतच्या गिरगावच्या सीमा सध्या गणपतीमय झाल्याचे चित्र आहे.
चंदनवाडी, गवळीवाडी, बापदेव, चिराबाजार, ठाकूरद्वार नाक्यापासून धोबीवाडी, मुगभाट, खत्तरगल्ली, कुंभारवाडा, मुंबादेवी, भुलेश्वर येथील गणपतींनी येथे उत्साह संचारला आहे. प्रार्थना समाज, बनाम हॉल लेन, व्ही.पी. रोड, ऑपेरा हाऊस, दोन हत्ती, भडकमकर मार्ग अशा गिरगावच्या पंचक्र ोशीतील विभागही सध्या गणपतींनी गजबजले आहेत. खेतवाडीच्या 13 गल्ल्यांतूनही बाप्पाचा गजर सुरू असून, भाविकांची येथे दाटी झाली आहे. केशवजी नाईक चाळ, खाडिलकर मार्ग, खोताची वाडी, आंग्रेवाडी, भाजीगल्ली, तात्या घारपुरे पथ आदी गिरगावातील गल्लीबोळेही गणरंगात न्हाऊन निघाली आहेत.
मुंबईतून खास इथे येणारे भक्तगण गिरगावात एकवटले असून, अनंत चतुर्दशीर्पयत हा माहोल असाच टिकून राहणार आहे. आपल्या जुन्या चालीरीती जोपासत गिरगाव सध्या गणरायाच्या सेवेत दंग आहे आणि गिरगावचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वसा सांभाळत अंतिम चरणाकडे सरकू लागलेल्या यंदाच्या गणोशोत्सवात ‘गणपतीबाप्पा मोरया’चा गजर उत्तरोत्तर वाढत चालला आहे.
शाडूच्या मातीची परंपरा कायम
गिरगावातले मानाचे गणपती म्हणून ओळखल्या जाणा:या गणरायांनी शाडूच्या मातीच्या मूर्तीची परंपरा यंदाही जपल्याचे दिसून येत आहे. निकदवरी लेनचा गिरगावचा राजा, खत्तरगल्लीचा महागणपती, मुगभाटातील महाराजा, सूर्यमहालचा बाप्पा आदी गणपती शाडूच्या मातीचे असून, वर्षानुवर्षे यात बदल झालेला नाही. पर्यावरणपूरक गणोशोत्सवाचा गिरगावने घेतलेला वसा यानिमित्ताने पुन्हा एकदा ठळकपणो अधोरेखित होत आहे.