Join us

खुशखबर...! मुंबईमध्ये न्यू इयर सेलिब्रेशन करा रात्रभर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 20:04 IST

मुंबई पोलिसांनीही कंबर कसली असून 31 डिसेंबरच्या रात्री शहरात 40 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असून आणखी एक चांगली बातमी सरकारने दिली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील पब, बार, हॉटेल्स रात्रभर उघडे राहणार आहेत. मात्र, याचबरोबर मुंबई पोलिसांचाही मोठा फौजफाटा डोळ्यात तेल ओतून लक्ष ठेवणार आहे. 

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. पब, बार याबरोबरच सोसायट्याही ओल्या पार्ट्यांचे आयोजन करण्य़ात येते. बऱ्याच ठिकाणी पासेसही ठेवण्यात येतात. यामध्ये तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यांना याचा आनंद घेता यावा यासाठी राज्य सरकारने मुंबईतील पब, बार, हॉटेल्स रात्रभर चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. 

तसेच मुंबई पोलिसांनीही कंबर कसली असून 31 डिसेंबरच्या रात्री शहरात 40 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. महिलांच्या छेडछाडीचे प्रकार थांबिवण्यासाठी ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलिसही असणार आहेत. याचबरोबर लाईव्ह कॅमेरा मॉनिटरिंगही करण्यात येणार असल्याचे डीसीपी कार्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख मंजुनाथ सिंघे यांनी सांगितले आहे. 

सोसायटी, गच्चीवर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पोलिसांची परवानगी हवी...अन्यथा...

 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसराज्य सरकार