Join us

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, 168 जागांवर भरती, ऑनलाईन करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 15:16 IST

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून आता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे

मुंबई - राज्यात आणि देशातून कोरोना आता हद्दपार होत आहे. त्यामुळे, पूर्वीप्रमाणे सर्वकाही सुरळीत सुरू झालं असून गेल्या अनेक दिवसांपासून भरतीच्या जाहिरातीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून आता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विविध पदांच्या १६८ जागांवर ही भरती होत आहे. त्यासाठी, सर्व मार्गदर्शक सूचना आणि संपूर्ण जाहिरात पाहण्यसाठी खालील लिंकवर क्लिक करा. उमेदवारांना १० एप्रिल २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज करता येईल. 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विविध पदांच्या एकूण १६८ जागासहायक संचालक, प्रशासकीय अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि सहायक आयुक्त पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

येथे अर्ज करा 

टॅग्स :एमपीएससी परीक्षानोकरीमुंबई