लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चांगले साहित्य वाचल्याने सहानुभूती निर्माण होते. साहित्याच्या माध्यमातून, व्यक्तीला वेगवेगळ्या पात्रांचा, परिस्थितीचा आणि दृष्टिकोनाचा सामना करावा लागतो, जे सर्व वाचकांना इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि सहानुभूती विकसित करण्यास मदत करतात, असे मत ज्येष्ठ कवी व गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. ‘अनंतरंग’ या मानसिक आरोग्य सांस्कृतिक महोत्सवात साहित्याच्या भूमिकेबद्दल अख्तर बोलत होते.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त वेल्स्पन फाउंडेशनच्या वतीने प्रथमच मुंबईत ‘अनंतरंग’ या मानसिक आरोग्य महोत्सवाचे आयोजन केले होते. या निमित्त मन व संस्कृतीचा परिवर्तनकारी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कलाकार, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, धोरणतज्ज्ञ व क्रिएटर्स असे ६०० पेक्षा अधिक सहभागी एकत्र आले.
वैयक्तिक कथांची पुनर्प्राप्तीअख्तर यांच्या नेतृत्वाखाली आणि दीपक कश्यप यांनी सूत्रसंचालन केलेल्या ‘कविता, दृष्टिकोन आणि मन’ या सत्रात कविता व कथाकथनामुळे वैयक्तिक कथांची पुनर्प्राप्ती करण्यास कशी मदत होते, याचा मागोवा घेण्यात आला. तसेच तर ‘लाइट्स, कॅमेरा, मेंटल हेल्थ’ या सत्रात कथाकथनाच्या माध्यमातून रूढीवादी विचारांच्या पलीकडे जाऊन चित्रपट सहानुभूती कशी निर्माण करू शकतात याचा आढावा घेण्यात आला.
Web Summary : Reading good literature fosters empathy by exposing readers to diverse perspectives, stated Javed Akhtar at the 'Anantrang' mental health festival in Mumbai. The festival, organized by Welspun Foundation, explored mental health through art, culture, and discussions.
Web Summary : जावेद अख्तर ने मुंबई में 'अनंतरंग' मानसिक स्वास्थ्य महोत्सव में कहा कि अच्छा साहित्य पाठकों को विविध दृष्टिकोणों से अवगत कराकर सहानुभूति को बढ़ावा देता है। वेल्सपन फाउंडेशन द्वारा आयोजित इस महोत्सव में कला, संस्कृति और चर्चाओं के माध्यम से मानसिक स्वास्थ्य का पता लगाया गया।