Join us

गोमुत्राने कॅन्सर बरा होत नाही, टाटा मेमोरियलमधील तज्ञ डॉक्टरांची साध्वीला चपराक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 17:31 IST

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक नवा शोध लावला.

मुंबई - मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर रिसर्च सेंटरचे संचालक राजेंद्र बडवे यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा दावा फेटाळून लावला आहे. गाईचे गोमुत्र पिल्यामुळेच माझा कर्करोग बरा झाल्याचं म्हटले. तसेच, गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास बीपी (रक्तदाब) कमी होतो, यांसह अनेक दावे प्रज्ञा ठाकूर यांनी केले होते. मात्र, वैद्यकीय जगतात याबाबत कुठलाही पुरावा अस्तित्वात नसल्याचे डॉ. राजेंद्र बडवे आणि त्यांच्या टीमने स्पष्ट केलं आहे. 

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेल्या भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक नवा शोध लावला. प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या या विधानामुळे त्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. गोमुत्रामुळे माणसाचा कॅन्सर बरा होतो असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी, माझा कर्करोग गोमुत्र पिल्यानेच बरा झाल्याचा दावा त्यांनी केला होता. गाईच्या पाठीवरुन हात फिरवल्यानंतर माणसाचा बीपी नियंत्रणात राहतो. तसेच गोमुत्र आणि पंचगव्य यांच्यापासून बनलेल्या औषधामुळे माझा कॅन्सर बरा झाल्याचा दावा त्यांनी केला. पंचगव्य म्हणजे गोबर, दही, गोमूत्र अशा गोष्टींपासून बनवलेलं औषध शारिरीक आजारांना बरं करतं. तसेच, गाईच्या चेहऱ्यावरुन हात फिरवल्यानंतर गाईला आणि माणसाला दोघांनाही सुख मिळतं असंही त्यांनी सांगितल होतं. तसेच माझा कॅन्सरही त्यामुळेच बरा झाल्याचं साध्वी म्हणाल्या होत्या. मात्र, डॉक्टरांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

मुंबईतील ऑन्कोलॉजिस्टांनी भाजपा उमेदवाराचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे हे स्तनाच्या कर्करोगावर उपचार करणारे देशातील नामवंत सर्जन आहेत. डॉ. बडवे यांनी हा दावा फेटाळत, तसा कुठलाही पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कुठलाही वैद्यकी अहवाल या दाव्याचे समर्थन करत नाही. केवळ, रेडिओथेरपी, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी या वैद्यकीय उपचाराद्वारेच स्तनाचा कर्करोग बरा होतो, असे बडवे यांनी स्पष्ट केलंय. 

प्रज्ञा ठाकूर यांचे विधान हे लोकांना आणि रुग्णांना चुकीचा संदेश देणारे आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे उप-संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनीही साध्वीचे वक्तव्य खोटं असून कर्करोगाशी संबंधित रुग्णांची दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. यांसह रिसर्च सेंटरमधील अनेक कर्करोगावरील तज्ञ डॉक्टरांनीही प्रज्ञा ठाकूर यांचा दावा खोटा ठरवला आहे.  

टॅग्स :साध्वी प्रज्ञाकर्करोगमुंबईटाटाडॉक्टरहॉस्पिटललोकसभा निवडणूक