मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णकन्या
By Admin | Updated: January 25, 2015 01:11 IST2015-01-25T01:11:07+5:302015-01-25T01:11:07+5:30
मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकांवर यंदाही विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व कायम राखले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णकन्या
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकांवर यंदाही विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींनी वर्चस्व कायम राखले आहे. विद्यार्थ्यांच्या एकूण ४८ सुवर्णपदकांपैकी सुमारे ३७ सुवर्णपदकांवर मुलींनी नाव कोरले आहे, तर ११ मुलांना सुवर्णपदके मिळाली आहेत. विधी शाखेतून पदवी प्राप्त केलेल्या डायस क्रिस्तिना ट्रेवर या विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली.
शैक्षणिक वर्ष २0१३-१४ मध्ये विद्यापीठातून पदवी आणि पदविका प्राप्त केलेल्या १ लाख ५४ हजार ५१९ विद्यार्थ्यांना दीक्षान्त समारंभात पदवी प्रदान करण्यात आल्या. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण १ लाख २५ हजार ९९३ विद्यार्थ्यांमध्ये ६७ हजार ५७१ मुली आणि ५८ हजार ४२२ मुलांचा समावेश आहे. तर पदविका अभ्यासक्रमाच्या एकूण २८ हजार ५२६ विद्यार्थ्यांमध्ये १७ हजार २६८ मुली आणि ११ हजार २५८ मुलांचा समावेश आहे. पदवी, पदविका मिळविण्यातही मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. या सोहळ््यात ४८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. यापैकी आठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळाली असून, यामधील सात विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाचे आहेत. तर विधी शाखेतून तृतीय क्रमांकाने पदवी प्राप्त केलेल्या डायस क्रिस्तिना ट्रेवर एलिझाबेथ या विद्यार्थिनीला चार सुवर्णपदके मिळाली आहेत. या समारंभात ३0६ जणांना पीएच़डी़ प्रदान करण्यात आली. कला शाखेतून २७ हजार ७३५ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका मिळाली आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण ७१.९९ टक्के आणि २८.0१ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. विज्ञान शाखेतून १८ हजार २३४, विज्ञान शाखा ७६ हजार ९२७, तंत्रज्ञान १९३0१, व्यवस्थापन ९५0५ आणि विधी शाखेतून २८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.