अलिबाग नगरपरिषदेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा
By Admin | Updated: December 22, 2014 02:29 IST2014-12-22T02:29:40+5:302014-12-22T02:29:40+5:30
अलिबाग नगर परिषद यावर्षी आपले शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्ताने २५ ते २९ डिसेंबर

अलिबाग नगरपरिषदेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा
अलिबाग : अलिबाग नगर परिषद यावर्षी आपले शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्ताने २५ ते २९ डिसेंबर असे पाच दिवस रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संयुक्त विद्यमाने एका शानदार सोहोळ्याचे आयोजन अलिबागमध्ये करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होईल.
उद्धाटन सोहोळ््यात ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग नगर परिषदेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक व शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहोळ््याच्या कार्याध्यक्षा निमता नाईक यांनी दिलीआहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता सोहोळा
महोत्सवाचा सांगता समारंभ २९ डिसेंबर रोजी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पूर्वी या समारंभाचा सांगता समारंभ २८ डिसेंबर रोजी होईल, असे जाहीर करण्यात आले होते, परंतु विविध संस्थांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून महोत्सवाची मुदत २९ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने पर्यटकांना या महोत्सवाला भेट देता येईल.
बालकलाकारांना प्राधान्य
२५ ते २९ डिसेंबर दरम्यान विविध करमणुकीचे विविध कार्यक्र म आयोजित केले असून त्यामध्ये आजच्या रंगभूमीचे अनेक लोकप्रिय मान्यवर कलाकारांचा सहभाग राहील. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी उद्घाटन सोहळा, यावेळी शिवगर्जना ढोल पथक व शाळेतील विद्याथर््यांचे ‘‘मानवी मनोरे’’ सादर केले जाणार आहेत. सायंकाळी विद्यार्थीवर्गाचे बालसमुहगीत सादर होईल. अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
२६ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनाला संजय नार्वेकर व भूषण कडू यांचे प्रसिद्ध नाटक ‘सिर्कट हाऊस’ सादर होणार आहे. २७ रोजी सायंकाळी सात वाजता विक्रांत वार्डे प्रस्तुत ‘निषाद सेलिब्रेटी नाईट’ प्रस्तुत केली जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)