सलग पाचव्या दिवशी सोन्याचा भाव घसरला
By Admin | Updated: September 5, 2014 02:56 IST2014-09-05T02:56:44+5:302014-09-05T02:56:44+5:30
सलग पाचव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव मागणीअभावी 9क् रुपयांनी घसरून 27,86क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

सलग पाचव्या दिवशी सोन्याचा भाव घसरला
नवी दिल्ली : सलग पाचव्या दिवशी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव मागणीअभावी 9क् रुपयांनी घसरून 27,86क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दुसरीकडे जागतिक बाजारात सुधारणा झाल्याचे चित्र होते. औद्योगिक संस्था व नाणो निर्मात्यांकडून चांगली मागणी न झाल्याने चांदीचा भावही 15क् रुपयांनी कोसळून 42,2क्क् रुपये प्रतिकिलोवर आला.
सराफा व्यापा:यांनी सांगितले की, दिल्ली बाजारात मागणीअभावी सोन्याच्या भावात घसरण नोंदली गेली. दुसरीकडे जागतिक बाजारात मात्र मजबूत कल राहिला. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव क्.3 टक्क्यांनी वधारून 1,273.51 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भावही क्.1 टक्क्यांनी वाढून 19.2क् डॉलर प्रतिऔंस राहिला.
दिल्ली बाजारातच 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 9क् रुपयांनी घसरून अनुक्रमे 27,86क् रुपये व 27,66क् रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला. तयार चांदीचा भाव 15क् रुपयांनी कमी होऊन 42,2क्क् रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 5 रुपयांनी घटून 41,735 रुपये प्रतिकिलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)